कळंब शहरावर ‘सीसीटीव्ही’ची नजर

By Admin | Updated: May 26, 2014 00:27 IST2014-05-26T00:09:49+5:302014-05-26T00:27:17+5:30

कळंब : शहरातील विविध चौकांसह पोलिस ठाण्यात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ पोलिस निरीक्षकांच्या कक्षात ठाण्यासह शहरातील हलचालींवर नजर ठेवण्यात येत आहे़

CCTV sight on Kalamb city | कळंब शहरावर ‘सीसीटीव्ही’ची नजर

कळंब शहरावर ‘सीसीटीव्ही’ची नजर

 कळंब : शहरातील विविध चौकांसह पोलिस ठाण्यात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ पोलिस निरीक्षकांच्या कक्षात ठाण्यासह शहरातील हलचालींवर नजर ठेवण्यात येत आहे़ त्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासह पोलिसांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवण्यास मदत मिळत आहे़ शासकीय कार्यालयात अभ्यागतांसह सहकारी कर्मचार्‍यांच्या कामकाजावर, हलचालींवर लक्ष ठेवण्यासाठी, काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ याच अनुषंगाने शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, ठाण्यात येणार्‍या तक्रारदार, नागरिकांना योग्य वागणूक मिळावी, कर्मचार्‍यांच्या ठाण्यातील कामगिरीवर वर्तणुकीवर लक्ष रहावे, बंदीगृहातील कैद्यांच्या हलचालींवर लक्ष रहावे आदी विविध उद्देशाने ठाण्यासह शहरातील विविध चौकात पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांनी ठाण्यातील सर्व विभागावर लक्ष ठेवण्यासाठी याचे नियंत्रण स्वत:च्या कक्षातच ठेवले आहे़ त्यामुळे त्यांना सर्व हालचालींवर लक्ष ठेवता येत आहे़ (वार्ताहर) बंदीगृह कॅमेर्‍यात कैद कळंब पोलिस ठाण्यातील बंदीगृहात एक कॅमेरा बसविण्यात आला आहे़ या कॅमेर्‍याची चित्रफित पोलिस निरीक्षकांच्या कक्षातील मॉनिटरवर दिसणार आहे़ त्यामुळे कैद्यांकडून होणार्‍या विचित्र घटनांसह त्यांच्या हलचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे़ त्यामुळे बंदीगृहातील अप्रिय घटना टाळण्यास मोठी मदत झाली आहे़ चौका-चौकावरही नजर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, होळकर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ तसेच ठाणे अंमलदार कक्ष, विशेष शाखा, मुख्य प्रवेशद्वारावरही कॅमेर्‍यांची नजर आहे़ त्यामुळे कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासह अशा घटन घडविणार्‍यांचे चेहरे या कॅमेर्‍यात कैद होणार आहेत़ त्यामुळे शहराच्या काही भागावर नजर ठेवण्याचे पोलिसांचे काम सहजसोपे झाले आहे़

Web Title: CCTV sight on Kalamb city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.