मनपा क्षेत्रीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

By Admin | Updated: July 20, 2014 00:28 IST2014-07-20T00:17:23+5:302014-07-20T00:28:24+5:30

नांदेड : सिडको येथील क्षेत्रीय कार्यालयावर शुक्रवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे यापुढे सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच नागरिकांशी नित्य संबंध येणाऱ्या मनपाच्या विविध विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून

CCTV cameras will be installed at Municipal Regional Office | मनपा क्षेत्रीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

मनपा क्षेत्रीय कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

नांदेड : सिडको येथील क्षेत्रीय कार्यालयावर शुक्रवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे यापुढे सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच नागरिकांशी नित्य संबंध येणाऱ्या मनपाच्या विविध विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संभाव्य घटनेस प्रतिबंध करण्याची पूर्वतयारी करावी, अशी सूचना आयुक्त जी़ श्रीकांत यांनी सामान्य प्रशासन विभागाला केली़
सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर उपस्थित होऊ शकणाऱ्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित विभाग- प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते़ यावेळी अप्पर आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजेंद्र खंदारे, डॉ़ विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी पी़ पी़ बंकलवाड उपस्थित होते़
आयुक्त जी़ श्रीकांत म्हणाले, महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय आणि अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत दु:खद असून हल्लेखोरांच्या वतीने काही लोकांनी खोटी तक्रार करून गुन्हा नोंदवण्यास भाग पाडल्याचे कळले़ त्यानंतर आपण पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली़ जमाव पांगवण्याच्या उद्देशाने कदाचित प्रतितक्रार स्वीकारून पोलिसांनी असे केले असावे़ कर्तव्य बजावताना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खचून जाऊ नये़ प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले़
मूलभूत सुविधा पुरविताना महापालिकेस अनेकदा अप्रिय कारवाई करावी लागते़ अशाप्रसंगी सर्व क्षेत्रीय कार्यालय, पाणीपुरवठा व जलनि:सारण विभाग, बीएसयुपी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा विविध सेवा पुरविणाऱ्या विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ बसविण्यात यावेत, अशी सूचना उपायुक्त विद्या गायकवाड यांना केली़
कर्तव्य बजावताना कोणीही दबावतंत्राचा वापर करून अडथळा आणण्याची शक्यता असल्यास मला तत्काळ कळवावे़ त्यातून संबंधितांवर कसे नियंत्रण आणता येईल, याचा निर्णय घेता येईल़
आक्षेपकर्त्यांसोबत वादाचे प्रसंग टाळून सौम्य भाषेत संभाषण करून त्यांना माझ्याकडे किंवा अप्पर आयुक्तांकडे पाठवावे, असेही आयुक्त म्हणाले़ (प्रतिनिधी)

Web Title: CCTV cameras will be installed at Municipal Regional Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.