सिंधगावच्या रेशन दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा

By Admin | Updated: March 1, 2016 00:40 IST2016-03-01T00:20:38+5:302016-03-01T00:40:27+5:30

बालाजी कटके , रेणापूर रेशनच्या धान्य वितरणात दुकानदार नेहमी घोटाळा करीत असल्याचे आपण सर्वजण ऐकतो़ परंतु, धान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी कुठल्याही दुकानदाराने प्रयत्न केला

CCTV Camera at Ration Shop in Sindhgaon | सिंधगावच्या रेशन दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा

सिंधगावच्या रेशन दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा


बालाजी कटके , रेणापूर
रेशनच्या धान्य वितरणात दुकानदार नेहमी घोटाळा करीत असल्याचे आपण सर्वजण ऐकतो़ परंतु, धान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी कुठल्याही दुकानदाराने प्रयत्न केला अथवा नवीन संकल्पना राबविल्याचे ऐकिवात नाही़ मात्र, रेणापूर तालुक्यातील सिंधगाव येथील एका महिला मंडळाने आपल्या स्वस्त धान्य दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून धान्य वाटपात पारदर्शकता आणली आहे़ त्यामुळे हे जिल्ह्यातील पहिले रेशन दुकान सीसीटीव्ही नजरेखाली सुरु झाले आहे़
रेणापूर तालुक्यातील सिंधगाव हे ५ हजार लोकवस्तीचे गाव आहे़ गावात दोन स्वस्त धान्य दुकाने आहेत़ गावातील रेशन धान्य दुकान क्रं़२ हे आशाबी महिला मंडळातंर्गत आशाबी पठाण या चालवितात़ या दुकानात २२५ कार्डधारक आहेत़ या रेशन दुकानात नियमाप्रमाणे धान्य वितरण केले जाते़ तरीही गावातील एकाने धान्य मिळत नसल्याची तक्रार तहसील कार्यालयाकडे केली होती़ त्यामुळे तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी येऊन तपासणी केली असता नागरिकाच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले नाही़ दरम्यान, पठाण यांची आपल्या मंडळातील इतर महिला सदस्यांना एकत्र बोलावून आपल्या रेशनच्या धान्य वितरणात आणखीन पारदर्शकता आणण्यासाठी काय केले पाहिजे, यावर चर्चा केली़ चर्चेअंती रेशन दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरले़ त्यानुसार दुकानचालक आशाबी पठाण यांनी १५ हजार रुपये खर्चून दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत़ त्यामुळे नेमके धान्य वितरण होते की नाही? तसेच दर योग्य आकारला जातो की नाही, याची सहजपणे माहिती मिळण्यास मदत झाली आहे़

Web Title: CCTV Camera at Ration Shop in Sindhgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.