शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

भामट्याच्या शोधासाठी सीसीटीव्हीचा आधार

By admin | Updated: August 27, 2014 23:38 IST

वसमत : पीक कर्जाची रक्कम घेवून गावाकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचे एक लाख रुपये चोरट्यांनी मंगळवारी लांबवले होते. या प्रकरणातील भामट्यांचा तपास वसमत पोलीस कसोसीने करत आहेत.

वसमत : पीक कर्जाची रक्कम घेवून गावाकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचे एक लाख रुपये चोरट्यांनी मंगळवारी लांबवले होते. या प्रकरणातील भामट्यांचा तपास वसमत पोलीस कसोसीने करत आहेत. बुधवारी शेतकऱ्यासोबत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.वसमत येथील मोंढा भागात मंगळवारी दुपारी पांडुरंग सवंडकर (रा. टेंभूर्णी) या शेतकऱ्यांच्या अंगावर घाण टाकुन एक लाख रुपये भामट्यांनी लांबवले होते. सदर प्रकरणी वसमत पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज सराईत गुन्हेगारांच्या फोटोवरून तपास पुढे चालवला आहे. बुधवारी सपोनि हनुमंत रेजितरवाड, कांबळे आदींनी शेतकरी सवंडकर यांना सोबत घेवून सीसीटीव्हीमधील संशयित तपासण्याचे कामे सुरू केले आहे. अंगावर घाण टाकून पैसे लुटण्याची पद्धत अवलंबून लुटण्याची पद्धत वापरणाऱ्या हिस्ट्रीसिटरमधील कोणी गुन्हेगाव आहे ते तपासणार असल्याचे सपोनि रेजितवाड यांनी सांगितले.बँकेत सीसीटीव्ही असून अडचण नसून खोळंबावसमत येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यात झालेले चित्रिकरण निकृष्ट दर्जाचे असल्याचे आज सुमारे आले आहे. कॅमेरेच अत्यंत चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आलेले आहेत. काऊंटरच्या समोरच्या भिंतीवर कॅमेरे बसवण्यात आलेले असल्याने काऊंटरमधील कर्मचाऱ्यांच्याच चेहऱ्याचे चित्रीकरण होते तर बँकेत येणारे ग्राहक व व्यक्तीचे पाठीमागून चित्रीकरण होत असल्याचा प्रकार आज समोर आला. केवळ सीसीटीव्ही आहेत का? तर आहेत. असाच प्रकार आहे. यामुळे जर बँकेत एखादी गंभीर घटना घडली तर सीसीटीव्हीच्या फुटेजचा तपासासाठी उपयोग होणार की नाही? हाच खरा प्रश्न आहे. बुधवारी बँकेतील फुटेज तपासतांना पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याबद्दलची चिंता व नाराजी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली व योग्य पद्धतीने कॅमेरे बसविण्याची सुचना केली. वसमतच्या स्टेट बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांचे केवळ कातडी बचाव काम करण्याची पद्धत या प्रकाराने समोर आली आहे. (वार्ताहर)