भामट्याच्या शोधासाठी सीसीटीव्हीचा आधार
By Admin | Updated: August 27, 2014 23:38 IST2014-08-27T23:25:18+5:302014-08-27T23:38:19+5:30
वसमत : पीक कर्जाची रक्कम घेवून गावाकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचे एक लाख रुपये चोरट्यांनी मंगळवारी लांबवले होते. या प्रकरणातील भामट्यांचा तपास वसमत पोलीस कसोसीने करत आहेत.

भामट्याच्या शोधासाठी सीसीटीव्हीचा आधार
वसमत : पीक कर्जाची रक्कम घेवून गावाकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचे एक लाख रुपये चोरट्यांनी मंगळवारी लांबवले होते. या प्रकरणातील भामट्यांचा तपास वसमत पोलीस कसोसीने करत आहेत. बुधवारी शेतकऱ्यासोबत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.
वसमत येथील मोंढा भागात मंगळवारी दुपारी पांडुरंग सवंडकर (रा. टेंभूर्णी) या शेतकऱ्यांच्या अंगावर घाण टाकुन एक लाख रुपये भामट्यांनी लांबवले होते. सदर प्रकरणी वसमत पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज सराईत गुन्हेगारांच्या फोटोवरून तपास पुढे चालवला आहे. बुधवारी सपोनि हनुमंत रेजितरवाड, कांबळे आदींनी शेतकरी सवंडकर यांना सोबत घेवून सीसीटीव्हीमधील संशयित तपासण्याचे कामे सुरू केले आहे. अंगावर घाण टाकून पैसे लुटण्याची पद्धत अवलंबून लुटण्याची पद्धत वापरणाऱ्या हिस्ट्रीसिटरमधील कोणी गुन्हेगाव आहे ते तपासणार असल्याचे सपोनि रेजितवाड यांनी सांगितले.
बँकेत सीसीटीव्ही असून अडचण नसून खोळंबा
वसमत येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यात झालेले चित्रिकरण निकृष्ट दर्जाचे असल्याचे आज सुमारे आले आहे. कॅमेरेच अत्यंत चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आलेले आहेत. काऊंटरच्या समोरच्या भिंतीवर कॅमेरे बसवण्यात आलेले असल्याने काऊंटरमधील कर्मचाऱ्यांच्याच चेहऱ्याचे चित्रीकरण होते तर बँकेत येणारे ग्राहक व व्यक्तीचे पाठीमागून चित्रीकरण होत असल्याचा प्रकार आज समोर आला. केवळ सीसीटीव्ही आहेत का? तर आहेत. असाच प्रकार आहे. यामुळे जर बँकेत एखादी गंभीर घटना घडली तर सीसीटीव्हीच्या फुटेजचा तपासासाठी उपयोग होणार की नाही? हाच खरा प्रश्न आहे.
बुधवारी बँकेतील फुटेज तपासतांना पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याबद्दलची चिंता व नाराजी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली व योग्य पद्धतीने कॅमेरे बसविण्याची सुचना केली. वसमतच्या स्टेट बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांचे केवळ कातडी बचाव काम करण्याची पद्धत या प्रकाराने समोर आली आहे.
(वार्ताहर)