मुलीला पळविणारा सीसीटीव्हीत कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:32 IST2017-09-26T00:32:17+5:302017-09-26T00:32:17+5:30

हरात दोन दिवसांपूर्वी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. दुचाकीवरून पळून गेलेल्या या दोघांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.

CCC captured the kidnapper | मुलीला पळविणारा सीसीटीव्हीत कैद

मुलीला पळविणारा सीसीटीव्हीत कैद

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : शहरात दोन दिवसांपूर्वी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. दुचाकीवरून पळून गेलेल्या या दोघांच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी सोमवारी चार तरुणांची चौकशी केली.
मुळ कन्नड तालुक्यातील नागद येथील एक दाम्पत्य भोकरदन शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये चार वर्षांपासून राहतात. २३ संप्टेबरच्या या दाम्पत्याची १७ वर्षीय मुलगी हॉस्पिटलच्या मागच्या बाजूने एका तरूणाच्या दुचाकीवर बसून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज दिसते. मात्र सदर फुटेज स्पष्ट दिसत नसल्यामुळे पळवून नेणाºया तरुणाची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी आईच्या तक्रारी वरून भोकरदन पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक वैशाली पवार व रूस्तुम जैवळ तपास करीत आहेत.

Web Title: CCC captured the kidnapper