‘सीबीएसई’ बारावीचा निकाल जाहीर

By Admin | Updated: May 26, 2015 00:50 IST2015-05-26T00:30:07+5:302015-05-26T00:50:45+5:30

औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिलदरम्यान घेतलेल्या बारावी सीबीएसई परीक्षेचा निकाल सोमवारी सकाळी १० वाजता आॅनलाईन जाहीर केला

'CBSE' HSC results | ‘सीबीएसई’ बारावीचा निकाल जाहीर

‘सीबीएसई’ बारावीचा निकाल जाहीर


औरंगाबाद : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिलदरम्यान घेतलेल्या बारावी सीबीएसई परीक्षेचा निकाल सोमवारी सकाळी १० वाजता आॅनलाईन जाहीर केला. शहरातील जैन इंटरनॅशनल, रेव्हरडेल स्कूल, स्टेपिंग स्टोन, केंद्रीय विद्यालय, नाथ व्हॅली या शाळांनी निकालाच्या यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. बारावीच्या या निकालानंतर ‘सीबीएसई’ दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
यश जैन शाळेतून प्रथम
माळीवाडा येथील जैन इंटरनॅशन स्कूलच्या (जिसा) विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेतील दोन्ही शाखांतून यश कमलेश जैन याने ९६ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. समीक्षा संजय शर्मा ही द्वितीय आली असून, तिला ९२.६ टक्के गुण मिळाले आहेत. यश आणि समीक्षा हे दोघेही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत. विज्ञान शाखेतून प्राजक्ता नारायण पाटील ही ८८ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेच्या यशाबद्दल जिसाचे सचिव जितेंद्र छाजेड आणि व्यवस्थापकीय संचालक अभिजित छाजेड, प्राचार्य के. प्रशांतकुमार, जितेंद्र बुनलिया यांनी आनंद व्यक्त केला आहे.
रेव्हरडेलचा शंभर टक्के निकाल
रेव्हरडेल शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, राधिका शेलार या विद्यार्थिनीने ९३ टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. कीर्ती दास आणि अभिनंदन गुप्ता यांनी ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर श्रुती कल्याणीकर हिने ९१ टक्के गुण मिळवून तृतीय क्र मांक पटकावला आहे. शाळेतील ७६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. शाळेच्या यशाबद्दल चेअरमन राघवेंद्र जोशी, विश्वस्त संजीव शेलार, सी.पी. त्रिपाठी, नरेंद्र चपळगावकर, जयंत देशपांडे, प्रताप बोराडे, संचालक पी.व्ही. सोळुंके, प्राचार्य जयश्री गुजर, आशिष गट्टाणी तसेच शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नाथ व्हॅली स्कूल
नाथ व्हॅली स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून अक्षत बाकलीवाल याने ९७ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. दर्शन गट्टाणी आणि रजत मालू यांनी ९५.४ टक्के गुण घेतले असून, ते दोघेही द्वितीय आले आहेत. विज्ञान शाखेतून मोहित कासलीवाल हा ९६.४० टक्के गुण घेऊन प्रथम आला. मेहुल मोहगावकर याने ९६.२० टक्के गुण घेतले असून तो द्वितीय, तर वरद कोल्हे याने ९६ टक्के गुण घेतले आहेत. इंग्रजी विषयात मेहुलने सर्वाधिक ९८ गुण, अर्थशास्त्र विषयात अक्षत ९९ आणि मानसशास्त्र विषयात वरदने ९७ गुण मिळवले आहेत. प्राचार्य रंजित दास यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले आहे.
स्टेपिंग स्टोन
स्टेपिंग स्टोन स्कूलने यंदाही निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या शाळेच्या ८९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ५२ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी संपादन केली आहे. १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या वर गुण मिळविले आहेत. रिया मुसळेने ९४.६ टक्के गुण मिळविले, ती शाळेत प्रथम आली. त्यानंतर ९४.२ टक्के गुण संपादन करून शुभम शिंदे आणि सृष्टी सिंग हे दोघे द्वितीय आले. बिझनेस स्टडीज या विषयामध्ये शालिनी राजपूत हिने सर्वाधिक ९८ गुण मिळवले आहेत. या विषयात १३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.
केंद्रीय विद्यालय
केंद्रीय विद्यालयाचा निशांत कदम हा ९१.४ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला आहे. या शाळेचे एकूण ५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये १७ विद्यार्थिनी आणि २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Web Title: 'CBSE' HSC results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.