‘सीबीनेट’चा ४९२ क्षयरोग रूग्णांना आधार
By Admin | Updated: July 6, 2017 23:21 IST2017-07-06T23:14:39+5:302017-07-06T23:21:19+5:30
हिंगोली : क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे.

‘सीबीनेट’चा ४९२ क्षयरोग रूग्णांना आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाकडून काळजी घेतली जात आहे. जिल्हा रूग्णालयातील सीबीनेट यंत्राद्वारे क्षयरोगाचे लवकर निदान होण्यास मदत होत आहे. त्यामुळे रूग्णांना तत्काळ व वेळेत उपचार मिळत आहेत. अत्याधुनिक यंत्राद्वारे वर्षभरात ४९२ संशयित क्षयरोग रूग्णांची यंत्राद्वारे तपासणी केली.
पूर्वी दुर्धर समजला जाणारा, क्षयरोग (टी. बी.) पूर्णत: बरा होणारा आजार आहे. जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रामार्फत क्षयरोगाचा प्रसार वाढू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे जिल्हा रूग्णालयात सीबीनेट यंत्र उपलब्ध झाल्यापासून रूग्णांची गैरसोय टळली आहे. पूर्वी थुंकी तपासण्यासाठी रूग्णांना नागपूरला जावे लागत असे. त्यामुळे रूग्णाला आर्थिक भूर्दंड सोसावा लागे. शिवाय उपचार सुरू होण्यास वेळ लागत असे. परंतु आता सीबनेटद्वारे दोन तासांतच क्षयरोगाचे निदान होत आहे. लवकर निदान होत असल्याने उपचारही तत्काळ सुरू केले जात आहेत.
शहरासह ग्रामीण भागातही क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. क्षयग्रस्त रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.