शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! चोरीची गाडी वापरल्यास माफीचा साक्षीदार नव्हे जावे लागेल तुरुंगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 15:20 IST

शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकींपैकी ५ टक्के दुचाकी शहरातच विकण्यात येतात.

ठळक मुद्देगाडी पकडल्यास माफीचा साक्षीदार नव्हे बनवताहेत आरोपीपकडलेली गाडी चोरीची निघाल्यास विकत घेणाऱ्यास आरोपी बनविण्याची मोहीम

- राम शिनगारे

औरंगाबाद : चोरीची दुचाकी विकत घेतल्यास आता महागात पडणार आहे. गाडी पकडल्यानंतर पोलिसांकडे कागदपत्रे सादर करता आली नाही किंवा पकडलेली गाडी चोरीची निघाली, तर थेट गाडी विकत घेणाऱ्या व्यक्तीस आरोपी बनवून त्याला तुरुंगाची वारी घडविण्यात येत आहे. मागील सात महिन्यांत शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत तब्बल ७१ जणांना आरोपी बनविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरीच्या प्रकारात मोठी वाढ झाली आहे. दररोज चार- पाच दुचाकी चाेरीच्या घटना उघडकीस येत आहेत. प्रत्येक ठिकाणी दुचाकी चोरण्याच्या घटना आणि पद्धत एकसारखीच असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकींपैकी ५ टक्के दुचाकी शहरातच विकण्यात येतात. १० किलोमीटर अंतरात ५ टक्के आणि ५० किलोमीटरच्या परिसरात चोरीला गेलेल्या दुचाकींपैकी ५० टक्के दुचाकी विकण्यात येत असल्याचेही तपासात समोर आले आहे. तसेच १०० किलोमीटर अंतरामध्ये उर्वरित ५० दुचाकी विकण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी मागील सहा महिन्यांपासून रस्त्यावर एखाद्या दुचाकी चालकाला पकडल्यास त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली जाते. एवढेच नाही तर कार इन्फो, व्हेईकल इन्फो या ॲपवर गाडीचा नंबर टाकून सर्व माहिती गोळा केली जाते. संबंधित गाडीचालकाने दिलेली माहिती ॲपवरील माहितीशी जुळत नसल्यास चालकाला पकडले जाते. पकडलेली गाडी चोरीची निघाल्यास विकत घेणाऱ्यास आरोपी बनविण्याची मोहीमही सध्या सुरु आहे.

गावागावात पोलीस जाणारशहरातून चोरी होणाऱ्या दुचाकी गाड्यांची विक्री ग्रामीण भागात करण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात जाऊन शहरातील पोलिसांकडून चोरीच्या गाड्या पकडण्याची माेहीम राबविली जाणार आहे. चोरीची गाडी घेणारा एकजण जरी सापडला तर गाड्या चोरणाऱ्यांचे एक रॅकेट उघडकीस येऊ शकते. त्यादृष्टीने औरंगाबाद पोलीस तयारी करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

मशीनच सांगते चोरीची गाडीशहर वाहतूक पोलिसांकडे दंडाचे चलन भरण्यासाठी मशीन आलेल्या आहेत. या मशीनवर गाडीच्या क्रमांकासह इतर माहिती टाकताच ती गाडी चोरीची आहे की नाही हा अलर्ट मिळतो. चोरी झालेल्या गाड्यांचा क्रमांक, चेसीस नंबरसह इतर माहिती मशीनमध्ये आहे. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या चोरीच्या गाड्या आता मोठ्या प्रमाणात पकडल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी चोरीची गाडी विकत घेऊ नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबादbikeबाईक