९० हजारांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:19 IST2019-04-10T23:19:22+5:302019-04-10T23:19:45+5:30
शिवराई पथकर नाक्यावर मंगळवार रात्री वाळूज पोलिसांनी ९० हजारांचा गुटखा जप्त केला.

९० हजारांचा गुटखा पकडला
वाळूज महानगर : शिवराई पथकर नाक्यावर मंगळवार रात्री वाळूज पोलिसांनी ९० हजारांचा गुटखा जप्त केला. तसेच गुटख्याची वाहतूक करणारा रिक्षाही (एम.एच.२०, डी.एफ.२४०९) जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी रिक्षाचालक योगेश महानोर (रा.जुना मोंढा, औरंगाबाद) याला ताब्यात घेतले तर दीपक वाघमारे (रा.हनुमाननगर, औरंगाबाद) हा फरार झाला. अन्न व औषधी प्रशासनाचे योगेश कणसे यांनी बुधवारी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस तपासात गुटखा प्रकरणात सचिन म्हस्के व समीर शेख यांचा हात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.