तब्बल ११४० वाहनांवर केसेस
By Admin | Updated: May 19, 2014 00:14 IST2014-05-18T23:42:58+5:302014-05-19T00:14:50+5:30
हिंगोली : जिल्हयात अवैध प्रवासी वाहतूक व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांविरूद्धपोलिसांनी १ ते १५ मे दरम्यान विशेष मोहीम राबवली आहे.
तब्बल ११४० वाहनांवर केसेस
हिंगोली : जिल्हयात अवैध प्रवासी वाहतूक व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांविरूद्धपोलिसांनी १ ते १५ मे दरम्यान विशेष मोहीम राबवली आहे. यामध्ये १ हजार १४० वाहनांवर केसेस करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जिल्हा पोलिस दलाच्य वतीने १२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली. पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक रावसाहेब भापकर, सहायक पोलीस निरीक्षक आनंद खंदारे यांनी ही मोहीम यशस्वी केली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत १ हजार १४० वाहन चालकावंर केसेस करून त्यांच्याकडून सुमारे २५ लाख ८ हजार ६१२ रूपये दंड वसूल करण्यात आला. याच कालावधीमध्ये पोलिसांनी जिल्ह्यात अवैध दारूविक्री करणार्यांविरूद्ध विशेष मोहीम राबविली. जिल्ह्यातील १२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ८ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईमध्ये १३२ आरोपींविरूद्ध केसेस करून त्यांच्याजवळून १४ हजार ७३६ रूपये किंमतीचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. (वार्ताहर)