पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेप

By Admin | Updated: February 2, 2016 00:28 IST2016-02-02T00:20:36+5:302016-02-02T00:28:00+5:30

लातूर : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खूनाचा आरोप न्यायालयात सिध्द झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने औसा तालुक्यातील उंबडगा (बु.) येथील

In the case of wife's murder, | पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेप

पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेप


लातूर : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खूनाचा आरोप न्यायालयात सिध्द झाल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने औसा तालुक्यातील उंबडगा (बु.) येथील विशाल थोरात यास सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
औसा तालुक्यातील उंबडगा (बु.) येथील विशाल थोरात याचा पुनम (२२) शी पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर पत्नी पुनम ही आपल्या माहेरी राहात होती. फोन केल्यानंतर ती पतीशी बोलत नव्हती. या कारणावरुन पती विशाल थोरात हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवू लागला. दरम्यान मृत्यूपूर्वी पत्नी चार महिन्यापासून माहेरीच राहत होती. या काळात विशाल व्यसनी बनला, यातूनच तो कर्जबाजारीही झाला. शेवटी चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा काटा काढायचा यासाठी त्याने सासरवाडी गाठली. २१ आॅक्टोबर २०१४ रोजी आपल्याला पुण्याला जायचे असून, त्यासाठी आपण तिकिट काढून आणू असे म्हणून पत्नीस सायंकाळी माहेरहून उंबडगा येथे घेवून जाण्यासाठी निघाला. दरम्यान वाटेत उंबडगा शिवारात त्याने पत्नीचा तोंड, नाक दाबून खून केला. या प्रकरणी औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी पक्षाच्यावतीने एकूण १३ साक्षीदारांचा जबाब न्यायालयात झाला. उपलब्ध पुरावा आणि सरकार पक्षाचे म्हणणे न्यायालयाने ऐकूण घेतले़ अंतिम सुनावणीनंतर न्यायालयात हा आरोप सिद्ध झाला़ त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे यांनी आरोपी विशाल थोरात यास कलम ३०२ भादंवि अन्वये जन्मठेप आणि दोन हजारांचा दंड अशी शिक्षा सोमवारी सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड़ अभयराज आरीकर, अ‍ॅड़ विठ्ठल देशपांडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: In the case of wife's murder,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.