शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

आदर्श विद्यालय मास कॉपी प्रकरणात संस्था अध्यक्ष, पर्यवेक्षक, पोलिसांसह २८ जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 19:35 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या पाहणीनंतर कारवाई; फुलंब्रीतील आदर्श विद्यालय कारवाईच्या कचाट्यात

फुलंब्री : तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयाच्या बारावीच्या परीक्षा केंद्रास शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली असता येथे सामूहिक कॉपी आढळली. याप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून २८ जणांविरूद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयात शनिवारी बारावीचा गणित विषयाचा पेपर होता. या केंद्राला दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली असता अनेक बाहेरील व्यक्ती केंद्राबाहेर जाताना आढळून आले. पोलिस केंद्राबाहेर बसून होते. ते केंद्रात येणाऱ्यांना थांबवत नव्हते. तसेच परीक्षा केंद्राच्या बाजूंनी मोठ्या प्रमाणात कॉप्या, पुस्तके फेकलेले आढळले. ते त्यांनी कर्मचाऱ्यांमार्फत जमा करून त्यांची पाहणी केली असता ते सर्व गणित विषयाचे दिसून आले. या सर्व कॉप्या उपस्थित कर्मचाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना पुरविल्याचे किंवा विद्यार्थ्यांनी सोबत आणल्यानंतर त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांनी काढून न घेतल्याचे दिसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यात या संस्थेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवा, तसेच संबंधित मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख, पर्यवेक्षकांसह बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यांच्या कारवाईच्या आदेशामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

२८ जणांविरुद्ध गुन्हे दाखलयाप्रकरणी गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर यांच्या फिर्यादीवरून संस्था अध्यक्ष लताबाई काशिनाथ जाधव, सचिव योगेश काशिनाथ जाधव, पर्यवेक्षक पी. ए. जाधव, नेहा लगड, एस. यू. भोपळे, पी. एस. काकडे, ए. बी. थोरात, ए. एन. शेख, के. बी. पवार, एस. जी. लोखंडे, ए. एन. सुरडकर, ए. बी. गायकवाड, आर. आर. वेताळ, पी. के. घुगे, एन. एस. ठाकूर, आर. बी. झाला, ए. बी. जाधव, व्ही. डी. तायडे, पी. एस. वाकळे, एम. डी. पाटील, व्ही. व्ही नलावडे, एल. के. डोळस, जे. बी. पवार, एस. टी. निर्मळ, बैठे पथकातील तलाठी आर. एस. देशमुख, पोलिस जमादार पंकज पाटील, होमगार्ड बी. एस. चव्हाण, जे. बी. पवार अशा एकूण २८ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHSC / 12th Exam12वी परीक्षाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर