अनियमित जीपीएफ हप्ते प्रकरणी शिक्षक संघटनांनी गाठला वित्त विभाग

By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:03+5:302020-12-04T04:12:03+5:30

शिष्टमंडळात शिक्षक भारती संघटनेचे प्रकाश दाणे, मच्छिंद्र भराडे, महेंद्र बारवाल तर आदर्श शिक्षक समितीचे दिलीप ढाकणे, शाकेर सय्यद यांच्यासह ...

In case of irregular GPF installments, the teachers' union reached the finance department | अनियमित जीपीएफ हप्ते प्रकरणी शिक्षक संघटनांनी गाठला वित्त विभाग

अनियमित जीपीएफ हप्ते प्रकरणी शिक्षक संघटनांनी गाठला वित्त विभाग

शिष्टमंडळात शिक्षक भारती संघटनेचे प्रकाश दाणे, मच्छिंद्र भराडे, महेंद्र बारवाल तर आदर्श शिक्षक समितीचे दिलीप ढाकणे, शाकेर सय्यद यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. जीपीएफ हप्ते नियमित जमा होत नाहीत. याची चाैकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. अनियमिततेने शिक्षकांना मिळणाऱ्या व्याजावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. २०१९-२० च्या जीपीएफ पावत्यांमध्ये काही केंद्रांवरून १३ तर काही केंद्रांचे १२ हप्ते जमा झाल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. त्यावर चाटे यांनी हा विषय काळजीपूर्वक हाताळून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने कळविले.

Web Title: In case of irregular GPF installments, the teachers' union reached the finance department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.