शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आधारभूत किमतीचे शेतक-यांना गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:25 AM

केंद्र सरकारने तुरीची आधारभूत किंमत ५४५० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे; मात्र महिना उलटूनही शासनाची तूर खरेदी बंदच असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आधारभूत किमतीपेक्षा १५०० रुपये कमी भावात तूर खरेदी करीत आहेत. याचा आर्थिक फटका शेतक-यांनाच बसत आहे. तुरीसह मूग, मका, उडीद, सोयाबीन, बाजरी या पिकांनाही आधारभूत किंमत मिळाली नाही. आधारभूत किंमत हे शेतक-यांसाठी केवळ स्वप्न राहिले आहे.

ठळक मुद्देशासनाची तूर खरेदी बंदच : फक्त आॅनलाईन नोंदणी; क्विंटलमागे १५०० रुपयांचा शेतक-यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र सरकारने तुरीची आधारभूत किंमत ५४५० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे; मात्र महिना उलटूनही शासनाची तूर खरेदी बंदच असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी आधारभूत किमतीपेक्षा १५०० रुपये कमी भावात तूर खरेदी करीत आहेत. याचा आर्थिक फटका शेतक-यांनाच बसत आहे. तुरीसह मूग, मका, उडीद, सोयाबीन, बाजरी या पिकांनाही आधारभूत किंमत मिळाली नाही. आधारभूत किंमत हे शेतक-यांसाठी केवळ स्वप्न राहिले आहे.कमिशन फॉर अ‍ॅग्रिकल्चरल कॉस्ट अ‍ॅण्ड प्राईस (सीएसीपी)ने केलेल्या शिफारशीच्या आधारावर किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात येत असते.उत्पादनाचा खर्च, एकूण मागणी, देशांतर्गत पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय दर, यासह इतर बाबी लक्षात घेऊन त्या आधारे आधारभूत किमतीची शिफारस करण्यात येते. सीएसीपीचे यंत्रणा तज्ज्ञ असल्याने त्यांच्या शिफारशी सर्वसाधारणपणे जशाच्या तशा स्वीकारल्या जातात. यंदा डाळी आणि तेलबियांची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता आधारभूत किमतीत आणखी बोनसही जाहीर करण्यात आला आहे. २०१७-२०१८ साठी आधारभूत किमती पुढीलप्रमाणे मका-१४२५ रुपये, बाजरी-१४२५ रुपये, तूर- ५४५० रुपये, मूग- ५५७५ रुपये, उडीद- ५४०० रुपये, तर सोयाबीन- ३०५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. यापेक्षा जास्त भावात व्यापाºयांनी खरेदी करणे अपेक्षित आहे. जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आधारभूत किमतीपेक्षा कमी भावात व्यापारी खरेदी करीत असतील, तर अशा वेळी सरकारने हस्तक्षेप करीत आधारभूत खरेदी केंद्र सुरू करणे अपेक्षित असते; मात्र मागील ६ महिन्यांचा विचार केला, तर शेतकºयांसाठी आधारभूत किंमत ‘स्वप्नच’ ठरले आहे. कारण, बाजार समितीत हर्राशीमध्ये आधारभूत किमतीपेक्षा हजार ते दीड हजार रुपयांनी कमीच भाव त्यांना मिळाला आहे. सध्या जाधववाडी कृउबामध्ये व्यापारी ३९०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलने तूर खरेदी करीत आहेत. मंदीचे कारण, अन्य राज्यांत तुरीचे उत्पादन बंपर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे बाजार समितीत शासनाचे तूर खरेदी केंद्र उघडले आहे, पण खरेदीचे आदेश अजून आले नाहीत. तेथील दोन कर्मचारी शेतकºयांची फक्त आॅनलाईन नोंदणी करून घेत आहेत. आजपर्यंत १६७ शेतकºयांनीच आॅनलाईन नोंदणी केली आहे.मुळात बाजारात तूर डाळ ५७०० ते ५८०० रुपये प्रतिक्विंटल विकत आहे. तुरीचा हमीभाव ५४५० रुपये आहे. मागील वर्षी ६५ लाख क्विंटल तूर सरकारने खरेदी केली. त्याचा साठा बंपर आहे. अशा कात्रीत सरकार अडकले आहे. नुसते तुरीलाच हमीभाव मिळत नाही, असे नाही, तर बाजरी १०५० ते १४०० रुपये, नोव्हेंबरमध्ये मका ९०० ते १२०० रुपये विकला. आता १००० ते ११०० रुपये, तर मूग ४००० ते ४५०० रुपये क्विंटल या भावात बाजार समितीत विक्री झाला. हमीभावापेक्षा ४०० ते १ हजार रुपये कमी भाव शेतकºयांना मिळत आहे.खर्च ६ हजार, मिळाले ६३०० रुपयेएका एकरामध्ये ३ गोणी तुरीचे उत्पादन झाले. दीड क्विंटल तूर हातात आली. शेतात तूर लावण्यापासून ते कृउबात आणेपर्यंत ६ हजार रुपये खर्च आला. आज हर्राशी झाली व ६३०० हजार रुपये मिळाले. आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरू असते, तर दीड क्विंटलचे ८१७५ रुपये तरी हातात मिळाले असते. केंद्र सुरू नसल्याने १८७५ रुपयांचे नुकसान झाले.प्रल्हाद पवार, तूर उत्पादक (पिंप्रीराजा)