वाहक, चालकास मारहाण
By Admin | Updated: May 26, 2014 01:15 IST2014-05-26T00:55:31+5:302014-05-26T01:15:58+5:30
सिल्लोड : प्रवासी उतरविण्यासाठी बस उभी केल्याच्या कारणावरून बसच्या पाठीमागून येणार्या इंडिका कारमधील चार जणांनी बसचालक व महिला वाहकास मारहाण के ल्याची घटना घडली.

वाहक, चालकास मारहाण
सिल्लोड : प्रवासी उतरविण्यासाठी बस उभी केल्याच्या कारणावरून बसच्या पाठीमागून येणार्या इंडिका कारमधील चार जणांनी बसचालक व महिला वाहकास मारहाण के ल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील भराडी नाक्यावर घडली. याप्रकरणी इंडिका कारमधील अज्ञात ४ जणांविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिल्लोड आगाराची बस (क्र. एम.एच.-२० डी-५५६१) चालक सय्यद अली सय्यद यासीन (५६) भराडीकडून सिल्लोडकडे घेऊन येत होते. भराडी नाक्याजवळ प्रवासी उतरविण्यासाठी चालकाने बस थांबवली. यादरम्यान बसच्या पाठीमागे इंडिका कार (क्र. एम.एच.-२० सीएस ०९१८) येत होती. आमच्या गाडीसमोर गाडी का उभी केली म्हणून इंडिका कारमधील चार जणांनी चालकाला चापट-बुक्क्याने मारहाण केली. या घटनेचा येथील चालक व वाहकांनी तीव्र निषेध केला आहे. (वार्ताहर) वाहक महिला असतानाही आरोपींनी उगारला हात महिला वाहक सुनीता गोरे आरोपींना समजावून सांगत असताना आरोपींनी महिला वाहकासही मारहाण क रीत सरकारी कामात अडथळा आणला व बसला दगड मारून काच फोडून नुकसान केले. यानंतर आरोपी इंडिका कारमध्ये बसून पळून गेले. चालक सय्यद अली यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार आरोपींविरुद्ध सिल्लोड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.