शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोनच्या अफवेनंतर संशयावरून कारच्या काचा फोडल्या; चोरीच्या भीतीने ग्रामस्थ रात्रभर जागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 19:03 IST

शिवना परिसरातील आडगाव गावाजवळ एक कार जालन्याकडे जात असताना ग्रामस्थांनी चोरटे आल्याचे समजून या कारवर दगडफेक केली.

सिल्लोड : गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील विविध गाव परिसरात रात्री ८ ते ११ वाजेच्या सुमारास आकाशात अनेक ड्रोन घिरट्या मारत असल्याने नागरिक भयभीत झाले असताना शिवना येथे २८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता आडगावजवळ चोराच्या संशयावरून ग्रामस्थांनी जालन्याकडे जाणाऱ्या एका कारच्या काचा फोडल्याची घटना घडली.

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा, उंडणगाव, मांडणा, गोळेगाव, अजिंठा, शिवना, मादनी, पिंपळदरी, बाळापूर अजिंठा लेणी आदी भागांत तीन दिवसांपासून रात्री ८ ते ११ वाजेच्या सुमारास आकाशात अनेक ड्रोन घिरट्या मारत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे चोर चोरी करण्याच्या उद्देशाने ड्रोनद्वारे पाहणी करीत असल्याची अफवा पसरली. त्यामुळे ग्रामस्थ रात्रभर पहारा देत आहेत. या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता शिवना परिसरातील आडगाव गावाजवळ एक कार जालन्याकडे जात असताना ग्रामस्थांनी चोरटे आल्याचे समजून या कारवर दगडफेक केली. यात कारच्या काचा फुटल्या. कारमध्ये तीन जण होते. घाबरून चालकाने भरधाव वेगाने कार नेत स्वत:चा जीव वाचवला.

अजिंठा लेणी परिसरात ३ ड्रोनद्वारे पाहणीसंवर्धन व संरक्षणासाठी अजिंठा लेणीच्या तीनशे मीटर अंतराच्या आत केंद्र व राज्य शासनाने ड्रोन उडविण्यास निर्बंध घातले आहेत. असे असताना शुक्रवारी (दि. २७) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास लेणीत ३ ड्रोनने घिरट्या घातल्या. यामुळे खळबळ उडाली. लेणी परिसराची ३७ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून मार्फत सुरक्षारक्षक, कर्मचारी व पोलिसांच्या माध्यमातून येथे २४ तास निगरानी केली जाते. असे असतानाही ३ ड्रोनद्वारे टेहळणी झाल्याने पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक राज पाटील, स.पो.नि. प्रफुल्ल साबळे यांनी लेणीत धाव घेतली. यावेळी तीन ड्रोन कॅमेरे लेणी, सप्तकुंड धबधबा व व्हयू पॉइंट परिसरात घिरट्या घालताना दिसून आले. रात्री एक वाजेपर्यंत त्यांनी संपूर्ण लेणी परिसर पिंजून काढला. सुरक्षेच्या दृष्टीने लेणीतील सप्तकुंड धबधबा परिसरातही सुरक्षाकर्मी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती मनोज पवार संवर्धन सहायक भारतीय पुरातत्त्व विभाग यांनी दिली.

ड्रोनसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीजिल्हाधिकारी कार्यालयाचे १६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत कन्नड, सिल्लोड, पैठण व वैजापूर तालुक्यातील काही ठराविक गावांत एका कंपनीला ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे नागरिकांनी घाबरू नये व अफवा पसरवू नये.-अमोल ढाकणे, सहायक पोलिस निरीक्षक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी