वाहने झाली भंगार...!
By Admin | Updated: March 31, 2015 00:41 IST2015-03-31T00:22:34+5:302015-03-31T00:41:15+5:30
वाळूज महानगर : अपघात, चोरी, बेवारस इ. प्रकरणांत जप्त केलेली वाहने अनेक वर्षांपासून वाळूज पोलीस ठाण्यात तशीच धूळखात पडली असून, अनेक वाहनांचे सुटे भाग गायब झाले आहेत.

वाहने झाली भंगार...!
वाळूज महानगर : अपघात, चोरी, बेवारस इ. प्रकरणांत जप्त केलेली वाहने अनेक वर्षांपासून वाळूज पोलीस ठाण्यात तशीच धूळखात पडली असून, अनेक वाहनांचे सुटे भाग गायब झाले आहेत. लिलाव प्रक्रियेकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने लाखो रुपयांच्या वाहनांना गंज चढत आहे.
वाळूज पोलिसांनी अनेक बेवारस वाहनेही जमा करून ठेवली आहेत. यातील बरीच वाहने मालक घेऊन जातात; पण अपघात प्रकरणातील वाहने अपशकुनी समजून मालक ते नेण्यास टाळाटाळ करतात. काही जणांना वाहन पोलिसांनी जप्त केल्याचे न समजल्याने ते चोरीस गेल्याचे समजतात, तर काही मालक वाहनांची कागदपत्रे नसल्याने तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे ही वाहने मालक न मिळाल्याने ठाण्यात पडून राहतात.
या संदर्भात पोलीस निरीक्षक अशोक कदम म्हणाले की, त्यांनी दोन वर्षांपूर्वी ठाण्यातील वाहने लिलाव करून विकली आहेत. केवळ ९ वाहनांच्या मालकांचा अद्याप शोध लागलेला नाही. बाकीची वाहने चालू गुन्ह्यातील आहेत.