शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; ट्रॉलीतील लोखंड कारमध्ये घुसल्याने चालकाचे अर्धेशीर धडावेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 19:00 IST

भरधाव वेगातील ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे पाठीमागील दोन्ही चाक निखळले, त्यात मागील कार ट्रॉलीवर धडकली

- मेहमूद शेख

वाळूज महानगर : ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक निखळल्याने भरधाव कार ट्रॅक्टरवर धडकली. या भीषण अपघातात कार चालकाचा अर्धे शीर धडावेगळे होऊन जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टरचे दोन तुकडे होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील तिसगाव चौफुलीवर घडला. 

सोलापूर-धुळे महामार्गावर रस्त्याच्या बाजुला संरक्षक लोखंडी गार्ड बसविण्याचे काम सुरु आहे. आज बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.२०, जी.ई.१०८५) चा चालक हा ट्रॉलीमध्ये लोखंडी गार्ड भरुन साजापूरकडून ए.एस.क्लबच्या दिशेने चालला होता. भरधाव वेगातील ट्रॉलीचे पाठीमागील दोन्ही चाक निखळ्याने ट्रॅक्टरचे नियंत्रण बिघडले. याचवेळी पाठीमागुन भरधाव येणारी कार (क्रमांक एम.एच.२०, सी.एस.०५०४) ट्रॉलीवर जाऊन धडकली. त्यामुळे ट्रॉलीसह ट्रॅक्टर रस्त्यावरच उलटले. यातच ट्रॉलीमधील लोखंडी गार्ड खाली येऊन कारच्या काचेतून चालकाच्या डोक्यात शिरले. यामुळे कारचालकाचे अर्धे शिर धडावेगळे झाले. 

वाहनचालक आणि नागरिक तत्काळ मदतीसाठी धावले. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. डी. अधाणे, पोना.नवीद खान, पोकॉ. मंगेश मनोरे, पोकॉ.युसुफ शेख, पोकॉ. हरिकराम वाघ व वाहतुक शाखेचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, उपनिरिक्षक शंकर शिरसाट, आढाव, सहा.फौजदार गायकवाड, पोेहेकॉ. इम्रान अख्तर आदींनी अपघातस्थळी धाव घेतली. 

कारचालकाचे अर्धे शीर धडावेगळेट्रॉलीमधील लोखंडी गार्ड काचेतून आत शिरल्याने कारचालकाचे अर्धे शिर धडावेगळे झाले. दरम्यान, कारचा दरवाजा लॉक झाल्याने मोठ्या प्रयत्नाने दरवाजा तोडून चालकाचा मृतदेह कारबाहेर काढण्यात आला. कारचालकाचे अर्धे शिर धडावेगळे झाल्याने ओळख पटविण्यात अडचण आली. मात्र, चालकाजवळ ओळखपत्र मिळाले, यावरून चालकाचे नाव रोहिदास पाटीलबा उशीर (५६, रा.ठाकरेनगर, एन-२, औरंगाबाद) असे स्पष्ट झाले. 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद