विश्वासघात करून पळविली कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:03 IST2021-05-15T04:03:27+5:302021-05-15T04:03:27+5:30
करण दिलीप नरवडे (२९) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार गणेश विष्णू मसुरे (२९, रा. चिकलठाणा एमआयडीसी) ...

विश्वासघात करून पळविली कार
करण दिलीप नरवडे (२९) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार गणेश विष्णू मसुरे (२९, रा. चिकलठाणा एमआयडीसी) यांना १८ मार्च रोजी मुकुंदवाडी परिसरात आरोपी करण भेटला. पाच मिनिटासाठी तुमची कार द्या, महत्त्वाचे काम करून येतो, असे तो म्हणाला. आरोपी ओळखीचा असल्यामुळे त्यांनी त्याला विश्वासाने कार दिली. आरोपी कार घेऊन गेल्यावर परत त्यांच्याकडे फिरकला नाही. मसुरे यांनी त्याला कॉल केला असता आरोपीने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. एवढेच नव्हे तर त्यांना शिवीगाळ करून त्याने धमकावले. मसुरे यांनी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार नोंदविली.
===============
मोटारसायकलवर बनावट क्रमांक टाकणे भोवले
औरंगाबाद: मोटारसायकलवर बनावट क्रमांक टाकून मिरवणे एका जणाला चांगलेच महागात पडले. गस्तीवरील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पकडल्यावर त्याचा भंडाफोड झाला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
रोहित पुरुषोत्तम अंबिलवादे असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे फौजदार पी. पी. इंगले आणि कर्मचारी गस्तीवर असताना २ मे रोजी त्यांनी संशयावरून आरोपीला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याने दुचाकी त्याची असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला कागदपत्रे विचारली. कागदपत्रे पाहिल्यावर त्याच्या दुचाकीवरील क्रमांक बनावट असल्याचे दिसून आले. याविषयी कॉन्स्टेबल लखन गायकवाड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.