कार झाडावर आदळून दोघे ठार

By Admin | Updated: March 26, 2016 00:53 IST2016-03-26T00:48:34+5:302016-03-26T00:53:08+5:30

\कळंब : भरधाव वेगातील कार एका झाडावर आदळल्याने शहरातील दोन युवकांचा मृत्यू झाला़ या अपघातात एक कवी, पत्रकार म्हणून परिचित असलेले सतीश मडके

The car collapsed on a tree and killed two | कार झाडावर आदळून दोघे ठार

कार झाडावर आदळून दोघे ठार


\कळंब : भरधाव वेगातील कार एका झाडावर आदळल्याने शहरातील दोन युवकांचा मृत्यू झाला़ या अपघातात एक कवी, पत्रकार म्हणून परिचित असलेले सतीश मडके व कृषी सहाय्यक सुशिल चंदनशिव या दोघांचा मृत्यू झाला़ हा अपघात गुरूवारी दुपारी लोहटा पूर्व गावाजवळ घडला़
कळंब येथील सतीश हरिभाऊ मडके, कृषी सहाय्यक दत्ता जाधव व सुशील चंदनशीव हे तीन मित्र गुरूवारी दुपारी कारमधून (क्ऱएम़एच़१२-एक्स़एक्स़ ८७९०) कळंब- शिराढोण मार्गावरून जात होते़ मात्र, लोहटा पूर्व जवळ अचानक कारचालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली़ या अपघातात सुशिल चंदनशीव यांचा जागीच मृत्यू झाला़ तर गंभीर जखमी सतीश मडके, दत्ता जाधव यांना कळंब येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ तेथून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील ग्रामीण रूग्णालयात रेफर करण्यात आले़ मात्र, अंबाजोगाई येथील रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतीश मडके यांना मयत घोषित केले़ तर दत्ता जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत़
अपघातातील मयत सतीश मडके हे एक पत्रकार, कवी म्हणून परिसरात परिचित होते़ तर कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून काम करणारे सुशिल चंदनशिव हे साहित्यिक भास्कर चंदनशीव यांचे सुपूत्र होते़ मयत सुशिल चंदनशीव यांच्या पार्थिवावर त्यांचे मूळ गाव हसेगाव (के़) येथे तर सतीश मडके यांच्या पार्थिवावर मोहा येथे गुरूवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले़ यावेळी विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते. दरम्यान, या घटनेने शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात होती़ (वार्ताहर)

Web Title: The car collapsed on a tree and killed two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.