शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, मुलगा ठार; आई -वडिलांसह बहीण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 18:29 IST

माळीवाडा गावाजवळील घटना : जखमींवर घाटीत उपचार सुरू

दौलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : लग्न उरकून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या कारला अपघात होऊन एकाच कुटुंबातील एकजण ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. मृतांत १३ वर्षीय मुलाचा समावेश असून आई-वडील, बहीण जखमी आहे. ही घटना मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील माळीवाडा गावाजवळ मंगळवारी पहाटे घडली.

सोहम ज्ञानेश्वर पाटील (वय १३ वर्षे, रा. मयूर पार्क, हर्सूल टी पॉइंट, छत्रपती संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ज्ञानेश्वर मधुकर पाटील हे आपल्या कुटुंबासोबत कारने (एमएच २० -ईई ०५१४) मालेगाव येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. लग्न उरकून छत्रपती संभाजीनगरकडे परत येत असताना त्यांची कार समृद्धी मार्गावरील माळीवाडा गावाजवळ आली होती. परंतु या ठिकाणी रस्ता दुरुस्तीचे काम चालू होते. या रस्त्याचा चालकाला अंदाज न आल्याने मंगळवारी पहाटे २ वाजता कार जोरदार आदळून अपघात झाला. यात ज्ञानेश्वर (वय ५६ वर्षे) यांच्यासह मुलगा सोहम, पत्नी नम्रता (वय ४८ वर्षे), मुलगी साक्षी (वय १८ वर्षे) हे चारजण गंभीर जखमी झाले. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच हायवे वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विनोद भालेराव यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेऊन जखमींना समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून सोहम यास मृत घोषित केले. तर उर्वरित तीन जणांवर उपचार सुरू आहेत.

सोहमचा सहा दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवसज्ञानेश्वर पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील हडको येथील बळीराम पाटील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मृत सोहम याचा २४ एप्रिल रोजी तेरावा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस कुटुंबीयांनी धूमधडाक्यात साजरा केला होता. परंतु वाढदिवसाच्या सहा दिवसानंतर ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग