पकडलेली तूर नागपूर पोलिसांच्या स्वाधीन
By Admin | Updated: November 4, 2015 00:22 IST2015-11-04T00:08:27+5:302015-11-04T00:22:21+5:30
जालना : नागपूर येथे तुरीच्या साठ्याबाबत गुन्हा दाखल झालेल्या एका व्यापाऱ्याने तेथील साठा जालन्यात पाठविला होता.

पकडलेली तूर नागपूर पोलिसांच्या स्वाधीन
जालना : नागपूर येथे तुरीच्या साठ्याबाबत गुन्हा दाखल झालेल्या एका व्यापाऱ्याने तेथील साठा जालन्यात पाठविला होता. याबाबत जालना पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर चंदनझिरा पोलिसांनी तो ट्रक मालासह पकडला होता. दरम्यान याबाबत जालन्यात कुठलाही गुन्हा दाखल न करता पोलिसांनी पकडलेला साठा आणि वाहन चालकांना नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
२३ आॅक्टोबर रोजी नागपूर येथील एका व्यापाऱ्यावर साठ्याबाबत कारवाई करण्यात आली. त्यातील पाच टन साठा त्या व्यापाऱ्याने एका ट्रक द्वारे जालन्यात पाठविला होता. त्या ट्रक चालकाने जालन्यातून दुसऱ्या ट्रकमध्ये तो माल भरला होता. हा ट्रक २५ आॅक्टोबर रोजी शहरातील सिटीजन पॉर्इंट जवळ उभा होता. दरम्यान वरिष्ठांच्या आदेशानुसार जालना पोलिसांनी हा ट्रकला पकडला होता.
दोन्ही ट्रक व तुरीचा साठा जप्त केला होता. दरम्यान याबाबत पोलिस ठाण्यात अवैध साठा वाहतूक व जीवनावश्यक वस्तु कायद्यान्वये चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी तसे न करता पकडलेला साठा व वाहन चालक यांना डायरीवर नोंद घेऊन नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान या प्रकरणाबाबत नागपूर येथे गुन्हा दाखल असल्याने आम्ही आरोपी व जप्त केलेला माल नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप जगताप यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
राज्यभरात तूर डाळीवरून वादंग निर्माण झालेले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार साठेबाजांवर धाडसत्र सुरू करण्यात आले होते.याच काळात जालन्यात आलेला तूरीचा पाचटन साठा चंदनझिरा पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर पकडला. मात्र पकडल्यानंतर याबाबत कुठलाही अधिक तपास न
करता पकडलेल्या मालाबाबत आम्ही मोठी कारवाई केली या तोऱ्यात साठ्यासमवेत फोटोसेशन करून प्रसिद्धी मिळविली. मात्र तो साठा कोणाचा? जालन्यात कोणी तो विकत घेतला होता का? याबाबत कुठलाही तपास केला नाही. तसेच जिल्हा पुरवठा विभागानेही याबाबत काहीच कारवाई न केली नाही, हे विशेष!