वाहनासह ४ लाखांचा गुटखा पकडला
By Admin | Updated: August 24, 2014 01:13 IST2014-08-24T01:08:35+5:302014-08-24T01:13:36+5:30
हिंगोली : विदर्भातून हिंगोलीकडे निघालेल्या वाहनासह चार लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे.

वाहनासह ४ लाखांचा गुटखा पकडला
हिंगोली : विदर्भातून हिंगोलीकडे निघालेल्या वाहनासह चार लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई हिंगोली- कनेरगाव नाका मार्गावरील कलगाव पाटीवर २३ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
एका वाहनातून अवैधरित्या गुटखा नेला जात असल्याची माहिती हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मोरे यांना मिळाली होती. त्यावरून गस्तीवर असलेले फौजदार अशोक जुकटे, पोना राहूल गोटरे, विजय उपरे, प्रविण सुरोसे, नारायण मुकाडे, दाजिबा कऱ्हाळे, गजानन पवार, संतोष पटवे, शेखर यादव, संतोष वानखेडे यांच्यासह जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक एम.एम. कारेगावकर यांनी कलगाव पाटीवर सापळा रचून पीकअप क्र. एमएच २९- टी ५६१९ पकडले. या वाहनामध्ये सितार, मावा, विमल पान मसाला, व्ही-वन सुगंधीत तंबाखू आदी प्रकारचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध शनिवारी रात्री उशिरा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)