मनपाच्या ५२९ भूखंडावर कब्जा!
By Admin | Updated: December 8, 2014 00:22 IST2014-12-08T00:14:04+5:302014-12-08T00:22:46+5:30
औरंगाबाद : मनपाचे अंदाजे ५२९ भूखंडांवर भूमाफियांनी कब्जा केला आहे.

मनपाच्या ५२९ भूखंडावर कब्जा!
औरंगाबाद : मनपाचे अंदाजे ५२९ भूखंडांवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. भूखंडांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. ते भूखंड त्यांच्या तावडीतून अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कुठलेही पाऊल पालिकेने अजून उचललेले नाही.
बीओटीऐवजी भाडेकरारावर भूखंड विकसित करून तेथे व्यापारी संकुल बांधण्याची मनपाची संकल्पना असून मोक्याच्या ठिकाणावरील भूखंडांचा शोध पालिकेने सुरू केला आहे. त्याचा अहवाल मालमत्ता विभागाने तयार केला आहे. सर्वाधिक अ प्रभागातील आरक्षित भूखंड अतिक्रमित झाले आहेत. अ प्रभागात जुने शहर येते. त्यानंतर ब प्रभागातील ११ भूखंड अतिक्रमित झाले आहेत. सिडकोचा भाग या प्रभागात येतो. ड प्रभागातील ११ भूखंड अतिक्रमित झाले आहेत.
भूखंडांवर अतिक्रमण झाल्यामुळे पालिकेला अनेक बाबींवर खर्च करावा लागतो आहे. अतिक्रमण हटाव पथकाला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा पगार द्यावा लागतो. तसेच २२ पोलिसांनाही पालिका या अतिक्रमण काढण्याच्या कामासाठी ३ वर्षांपासून पोसत आहेत. असे असताना अतिक्रमण जैसे थे आहे.