शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

'विश्वास बसणार नाही, विमान घ्यावे वाटेल'; पेट्रोल-डिझेलपेक्षाही विमानाचे इंधन स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 14:09 IST

fuel News : इंधनाचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना तुलनेने विमानात वापरले जाणारे इंधन जवळपास ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादच्या विमानतळावर दोन स्टेशन दररोज ५० विमानांमध्ये इंधन भरण्याची क्षमता

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : पेट्रोल, डिझेलच्या किमतीपेक्षा आकाशात भरारी घेणाऱ्या विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे दर कमी आहेत, असे सांगितले तर विश्वास बसेल का आणि हे खरे असेल तर मग आता रोजच्या कामासाठी विमान वापरावे का, असा विचारही अनेकांच्या मनात नक्की येईल. पण, हे खरे आहे. औरंगाबादेत पेट्रोलचा भाव प्रतिलिटर १०९ रुपये, तर डिझेलचा भाव प्रतिलिटर ९८ रुपयांच्या घरात आहे. विमानासाठी लागणाऱ्या ‘एटीएफ’ इंधनाचा भाव मात्र प्रतिलिटर ६० रुपये आहे. पण, हे इंधन फक्त विमानांसाठीच असते. ( Aviation fuel is cheaper than petrol-diesel) 

आकाशातून झेप घेत जाणाऱ्या विमानाचे आता फारसे कौतुक उरलेले नाही. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे औरंगाबादच्या आकाशातून रोज विमानांचे उड्डाण होत आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबाद यांसारख्या शहरांना काही तासांतच औरंगाबादकरांना पोहोचता येत आहे. विमानांच्या इंधनासाठी चिकलठाणा विमानतळावर दोन स्टेशन्स आहेत. यात एका स्टेशनची ७० हजार लिटर आणि दुसऱ्या स्टेशनची २ लाख १० हजार लिटर क्षमता आहे. साधारण महिन्याला ४० ते ५० विमानांमध्ये याठिकाणी इंधन भरले जाते. दररोज ५० विमानांचे उड्डाण झाले तरी ही दोन्ही स्टेशन्स इंधन भरू शकतील, एवढी मोठी क्षमता आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींनी नागरिक हैराण झाले आहेत. इंधनाचे दर रोज सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना तुलनेने विमानात वापरले जाणारे इंधन जवळपास ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक ग्राहकासाठी म्हणजे कंपनीसाठी हा दर कमी-अधिक असतो. पण विमानात काही लिटर नाही, एकाच वेळी हजारो लिटर इंधन भरावे लागते.

ए. टी. एफ., पांढरे पेट्रोलविमानासाठी वापरले जाणारे इंधन अतिशुद्ध स्वरूपातले असते. त्यास ‘पांढरे पेट्रोल’ असेही म्हटले जाते. त्यास ‘एव्हिएशन टर्बाईन फ्युएल’ (ए.टी.एफ.) असे तांत्रिक नाव आहे. हवामान थंड असो वा गरम, विमानातले इंधन इंजिनाला सतत शक्ती पुरवीत राहते. ते गरमीमुळे उडून जात नाही की थंडीमुळे गोठत नाही.

दोन कंपन्यांची सुविधाविमानतळावर विमानात टँकरने इंधन भरले जाते. यासाठी आपल्याकडे दोन कंपन्यांची सुविधा आहेत. औरंगाबादला वॅट ५ टक्के असल्याने जवळपास सर्व विमाने इथे इंधन भरतात. विमानाच्या इंधनाला ए.टी.एफ. म्हणतात. त्याचा दर साधारण ६० रुपये लिटर आहे.- विनायक कटके, सहायक महाप्रबंधक (वायू यातायात नियंत्रण), चिकलठाणा विमानतळ

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळFuel Hikeइंधन दरवाढ