शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

वांगे, कोबी, टमाटे अन् उसात लावली गांजाची झाडे; ८ एकरात अनेकदा पिक घेतल्याचे उघड

By राम शिनगारे | Updated: November 3, 2022 15:57 IST

८२ किलो वजनाची गांजाची ५६ झाडे जप्त करण्यात आली असून दोघे अटकेत

औरंगाबाद : आठ एकरमध्ये असलेल्या वांगे, काेबी, टमाटे आणि उसाच्या शेतात गांजाची झाडे लावण्यात आल्याचा प्रकार वेरुळ परिसरातील तलाववाडी शिवारात उघडकीस आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत तब्बल ८ लाख २४ हजार ५४० रुपये किंमतीची ८२ किलो ४ ग्रॅम वजनाची ५६ झाडे जप्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धनसिंग गुंडीराम गुमलाडू आणि झनकसिंग गुंडीराम गुमलाडू (रा. वेरुळ, ता. खुलताबाद) या दोघांना अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक प्रदीप पोटे, भरारी पथकाचे निरीक्षक विजय रोकडे यांना तलाववाडी शिवारातील गुमलाडू बंधुच्या गट नंबर ११२ मध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवारी सायंकाळी छापा मारला. धनसिंगच्या शेतात गांजाची १८, झनकसिंगच्या शेतात ३८ झाडे सापडली. एकुण ५६ झाडांचे वजन ८२ किलो एवढे भरले आहे. ही झाडे वांगे, कोबी, टमाटे, कापुस आणि उसाच्या शेतीत लावण्यात आली होती. या दोन्ही आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. ही कारवाई उपआयुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक प्रदीप पोटे, निरीक्षक विजय रोकडे, संजय जाधव, दुय्यम निरीक्षक एस.बी. रोटे, ए.ई. तातळे, भरत दौंड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे पाटील, एस.एस. गुंजाळे, जवान वाय.बी. गुंजाळ, आर.जे. मुरडकर, अनिल जायभाये, जी.पी. शिंदे, टी.ए. जारवाल, ज्ञानेश्वर सांबारे, कृष्णा पाटील, एस.एम. कादरी व किसन सुंदर्डे यांच्या पथकाने केले.

गांजाचे अनेकदा घेतले पीकशेतातुन जप्त केलेले गांजाच्या झाडांची खाेडं अतिशय मजबुत आहेत. यापूर्वी खोड कायम ठेवुन वरील गांजाची पाने कापुन घेतले. त्यानंतरही पुन्हा गांजाचे पिक घेतल्याचे झाडावरुन स्पष्ट होत असल्याचे अधीक्षक झगडे यांनी सांगितले.

अंमली पदार्थाची पहिलीच कारवाईराज्य उत्पादन शुल्कच्या औरंगाबाद विभागाने यापूर्वी अंमली पदर्थ पकडण्याची कारवाई केलेली नाही. ही पहिलीच कारवाई असावी, असे उपायुक्त प्रदीप पवार यांनी सांगितले. तर येत्या काळात अंमली पदर्थांच्या विक्रीविरोधात मोहिमच उघडण्यात येणार असल्याचे अधीक्षक झगडे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी