उमेदवारांचा ‘खाक्या’!

By Admin | Updated: October 8, 2014 00:53 IST2014-10-08T00:22:15+5:302014-10-08T00:53:23+5:30

बीड : राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले नेते अभावानेच पहायला मिळतात़ प्रमुख उमेदवारांपैकी १३ जणांची नावे वेगवेगळ्या कारणावरुन पोलिस दफ्तरी आरोपी

Candidates 'Khake'! | उमेदवारांचा ‘खाक्या’!

उमेदवारांचा ‘खाक्या’!


बीड : राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले नेते अभावानेच पहायला मिळतात़ प्रमुख उमेदवारांपैकी १३ जणांची नावे वेगवेगळ्या कारणावरुन पोलिस दफ्तरी आरोपी म्हणून नोंद झालेली आहेत़ त्या सर्वांना पोलिसी ‘खाक्या’ला सामोरे जावे लागलेले आहे़ उमेदवारांनी निवडणूक विभागाकडे दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रातून ही माहिती उजेडात आली आहे़
जिल्ह्यातील सहा विधनसभा मतदारसंघात १०९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत़ प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांवर आंदोलने, सरकारी कामात अडथळा, मारहाण, फसवणूक, गोळीबार अशा कलमांखाली गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत़ यापैकी कोणालाही शिक्षा झालेली नाही़ बहुतांश खटले न्यायालयात प्रलंबित आहेत तर काहींना खटल्यातून ‘क्लिन चिट’ मिळालेली आहे़ बुजूर्ग उमेदवारांच्या नावावर गुन्ह्यांची संख्या अधिक आहे़ शिवसेनेच्या कल्पना नरहिरे वगळता एकाही महिला उमेदवाराविरुद्ध गुन्हा नोंद झालेला नाही़
यांची पाटी कोरी !
केज विधानसभा निवडणुकीतील राकाँच्या उमेदवार नमिता मुंदडा, काँग्रेसच्या उमेदवार डॉ़ अंजली घाडगे, भाजपाच्या उमेदवार प्रा़ संगीता ठोंबरे, परळीतील भाजपाच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे, आष्टी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अशोक दहिफळे, माजलगाव मतदारसंघातील मनसेचे उमेदवार डॉ़ भगवान सरवदे, राकॉंचे उमेदवार प्रकाश सोळंके, गेवराईतील भाजपाचे उमेदवार अ‍ॅड़ लक्ष्मण पवार, मनसेचे राजेंद्र मोटे यांच्यावर एकही गुन्हा नोंद नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: Candidates 'Khake'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.