उमेदवार करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
By Admin | Updated: September 25, 2014 00:53 IST2014-09-25T00:38:28+5:302014-09-25T00:53:16+5:30
जालना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल हे २५ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. त्या दृष्टीकोनातून त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध पातळीवर

उमेदवार करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
जालना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल हे २५ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. त्या दृष्टीकोनातून त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध पातळीवर मोर्चेबांधणी केली आहे. अर्ज भरतेवेळेस स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे, त्याद्वारे मोठी वातावरणनिर्मिती व्हावी म्हणून काँग्रेसजणांनीही कंबर कसली आहे. गोरंट्याल यांचे हे शक्तीप्रदर्शन लक्षवेधी ठरेल, अशी चित्र आहे.
४सेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, बसपाचे रशीद पहेलवान हे २६ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. मनसेचे रवि राऊत २७ रोजी अर्ज दाखल करणार आहेत.
परतूर मतदारसंघात काँग्रेसचे आ. सुरेशकुमार जेथलिया व राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजार समिती सभापती बाबासाहेब आकात हे २६ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
४घनसावंगी मतदारसंघात २६ रोजी राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पालकमंत्री राजेश टोपे हे अर्ज दाखल करणार आहेत. मनसेचे सुनील आर्दड, बसपाचे सूरज उढाण हे २७ रोजी अर्ज दाखल करणार आहेत. विष्णू कंटुले हे २६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदारसंघातील सेनेची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.
४भोकरदन मतदारसंघात २६ रोजी राकाँचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आ. चंद्रकांत दानवे हे अर्ज दाखल करणार असल्याची माहिती रायुकाँचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण ठोंबरे यांनी दिली. २७ रोजी एल.के. दळवी हे अर्ज भरणार आहेत. तर भाजपाचे उमेदवार २६ रोजी भरणार असल्याचे कळते.
४बदनापूर मतदारसंघात सेनेचे आ. संतोष सांबरे व मनसेचे ज्ञानेश्वर गायकवाड हे २७ रोजी, राकाँचे बबलू चौधरी हे २६ रोजी उमेदवारी दाखल करणार.