शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'जायकवाडी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प नको'; भल्या पहाटे हजारो मच्छिमार उतरले नाथसागरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 12:10 IST

जायकवाडी धरणात उतरून हजारो मच्छीमारांनी भल्या पहाटे सुरू केले जलसमाधी आंदोलन

- दादासाहेब गलांडेपैठण: जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांनी आज पहाटे अचानक नाथसागरात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आंदोलक मच्छीमारांची संख्या वाढत जात असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

केंद्र सरकारच्या अधिन असलेल्या नॅशनल थर्मल कॉर्पोरेशन लिमिटेडला मराठवाड्यातील जायकवाडी धरण जलाशयात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र, या प्रकल्पामुळे हजारो मच्छीमारांचा व्यवसाय संपुष्टात येऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सदरील हा प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यात यावा यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बांधवांनी आवाज उठवला आहे. अनेक वेळ आंदोलन करून प्रशासनास निवेदन देऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही. 

दरम्यान, आज जायकवाडी मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या वतीने दोन्ही जिल्ह्यातील मच्छीमार दुपारी बारा वाजता नाथसागरावर आंदोलन करणार होते. मात्र, आंदोलनाची वेळ दुपारी बाराची असताना गमिनी काव्याने भल्या पहाटेच हजारो मच्छीमारांनी नाथसागरात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाआहे . तहसीलदार सारंग चव्हाण, डीवायएसपी सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि जगदाळे  सह विविध  विभागाचे अधिकारी कर्मचारी येथे उपस्थित आहेत.

२ लाख मच्छीमारांचा प्रश्नछत्रपती संभाजी नगर अहमदनगर जिल्हा मिळून केलेल्या सर्वेनुसार बावीस हजार कुटुंब मच्छीमार व्यवसाय करत आहेत.मच्छीमारी करणाऱ्यांची संख्या दोन लाखाच्या घरात आहे. दिवसाला एक मच्छीमार तीनशे ते चारशे रुपयांचा व्यवसाय करत असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यामुळेच प्रस्थापित सौरऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची मागणी आंदोलक करत आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagitationआंदोलनelectricityवीज