जीटीएलचा करार रद्द कराच!
By Admin | Updated: May 28, 2014 01:11 IST2014-05-28T00:55:35+5:302014-05-28T01:11:55+5:30
औरंगाबाद : जीटीएल कंपनीच्या कारभाराला औरंगाबादकर प्रचंड कंटाळले आहेत.

जीटीएलचा करार रद्द कराच!
औरंगाबाद : जीटीएल कंपनीच्या कारभाराला औरंगाबादकर प्रचंड कंटाळले आहेत. महावितरणने जीटीएलसोबत केलेला करार त्वरित रद्द करावा, अशी मागणी जीटीएलविरोधी नागरी कृती समितीने महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. जीटीएलचे अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांचे शोषण करीत आहेत. त्यांनी ४० ते ५० कोटी रुपयांचा ‘पी. डी. मीटर्स’चा घोटाळा केला आहे. ग्राहकांना अवाजवी बिल देणे, सदरील बिल सक्तीने वसूल करण्याचे काम ही खाजगी कंपनी करीत आहे. नागरिकांकडून जमा केलेला निधी आजपर्यंत महावितरणला अदा करण्यात आलेला नाही. जीटीएलकडे थकबाकीची रक्कम २५४ कोटीपर्यंत पोहोचली आहे. नागपूर आणि जळगाव शहरांमध्येही जीटीएलचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. यापूर्वी जीटीएलविरोधी नागरी कृती समितीने शासनाकडे जीटीएल हटावची मागणी केली आहे. महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आलेल्या निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष इमराण पठाण, हफीज अली, अॅड. संतोष गायकवाड, हाजी सय्यद अकील, अॅड. विकास खरात, जावेद खान आदींच्या सह्या आहेत. शहरातील लाखो नागरिकांना सेवा देण्यासाठी कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव शहरात वारंवार वीजपुरठा खंडित होणे, विजेचा दाब वाढून गृहोपयोगी विजेचे साहित्य जळणे. नवीन मीटर घेण्यासाठी शहरात जीटीएलची दोनच कार्यालये थकबाकी असलेल्या ग्राहकांना पार्ट पेमेंट न करून देणे सूचना न देता नागरिकांचे कनेक्शन परस्पर कापून टाकणे