‘संगमेश्वर’चा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:06 IST2017-04-18T00:06:03+5:302017-04-18T00:06:48+5:30

ईट : येथील जवळील मांजरा नदीवरील संगमेश्वर कालवा फुटल्यामुळे हे पाणी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे.

The canal of Sangameshwar Falls | ‘संगमेश्वर’चा कालवा फुटला

‘संगमेश्वर’चा कालवा फुटला

ईट : येथील जवळील मांजरा नदीवरील संगमेश्वर मध्यम प्रकल्पावर पाटबंधारे विभागाने २० वर्षांपूर्वी ६२ कोटी रुपये खर्च करून प्रकल्पाची उभारणी केली. मात्र, मागील काही दिवसांपासून कालवा फुटल्यामुळे हे पाणी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे.
बीड-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या मांजरा नदीवर संगमेश्वर मध्यम प्रकल्पास डॉ. पद्मसिंह पाटील यांनी १९८९ साली मंजुरी घेऊन या कामासाठी ६.५ कोटी रुपयांची तरतूद केली; परंतु सुधारित अंदाजपत्रकानसार या प्रकल्पावर ६२ कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च करण्यात आले. या प्रकल्पाच्या उभारणीचे मातीकाम १९९२ ला पूर्ण झाले, तर कंधभरणीचे काम १९९५ साली पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पावरून उजवा व डावा अशा दोन कालव्यांची कामे करण्यात आली. उजवा कालव्याचे अंतर ३० किमी असून, हा कालवा ईट, पांढरेवाडी, डोकेवाडी, गिरवली, पारगाव, रुई, जेबा हातोला, पांगरी, ब्रह्मगाव, लाखनगाव पारा, पिंपळगाव या गावांच्या शिवारातून जातो. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या डावा कालव्याचे अंतर २९.५ किमी असून, तो वाढवणा, पिंपळगाव, हिंगणी (बु), हिंगणी (खु), जेंबा, पिंपरी, पोत्रा, पांगरी, पारगाव, पालसिंगण या गावच्या शिवारामध्ये आहे.
दोन्ही कालव्याच्या माध्यमातून याद्वारे २४५० हेक्टर शेतीस पाणी मिळणार होते; दोन्ही कालव्याचे खोलीकरण कालव्यावर उभारलेले पूल, शेतचारीचे अपूर्ण कामे व वाढलेली झाडे-झुडपे यामुळे ५०० ते १००० मी. अंतरावर कालवा फुटून प्रकल्पातील सोडलेले पाणी नदीपात्रातून वाहून जात आहे. त्यामुळे प्रकल्पापासून ५०० मी. अंतरातही पाणी कालव्याद्वारे अद्यापपर्यंत जाऊ शकत नाही. (वार्ताहर)

Web Title: The canal of Sangameshwar Falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.