कॅम्पस क्लब सदस्य नोंदणी आजपासून
By Admin | Updated: July 12, 2015 00:18 IST2015-07-12T00:13:42+5:302015-07-12T00:18:11+5:30
जालना : शालेय विद्यार्थ्यांचे आगळेवगेळे आणि हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमत कॅम्पस क्लबसाठी सदस्यता नोंदणी रविवारी

कॅम्पस क्लब सदस्य नोंदणी आजपासून
जालना : शालेय विद्यार्थ्यांचे आगळेवगेळे आणि हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमत कॅम्पस क्लबसाठी सदस्यता नोंदणी रविवारी लोकमत कार्यालय तसेच विविध सेंटरर्सवर येथून सकाळी १० वाजेपासून प्रारंभ होत आहे.
वर्षभर विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी या निमित्ताने सदस्यांना मिळणार आहे. नोंदणीकरताच आकर्षक भेटवस्तूही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. लवकर या आणि क्लबचे सदस्य व्हा असे आवाहन कॅम्पस क्लबच्या आयोजकांनी केले आहे.
नोंदणी करताच सदस्यांना हमखास भेटवस्तू
कॅम्पस क्लब नेहमीच मुलांच्या विश्वात शिरुन त्यांना काय हवे काय नको या विषयी त्यांच्या मनातील भाव ओळखून भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करीत असते आवडतील अशा व हव्याहव्याशा वाटणाऱ्या अनेक भेटवस्तू कॅम्पस क्लबतर्फे यावर्षीही मुलांना देण्यात येणार आहेत.
कॅम्पस क्लबची नोंदणी करताच मुलांना आकर्षक असा डबल डेक्कर टिफीन बॉक्स भेटस्वरुपात मिळणार आहे. याशिवाय हमखास भेटवस्तूंचे कूपन्स मिळणार आहेत.
कॅम्पस क्लबच्या सदस्य होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक आकर्षक अशा हमखास भेटवस्तू मिळणार आहेत.
यामध्ये यम्मी पिझ्झा तर्फे एक पिझ्झा, वैष्णवी बेक आणि केकच्या वतीने पेस्ट्री व कचोरी, स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेत झिरो बॅलन्स अकाऊंट, रत्नदीप चित्रपटगृहात एक सिनेमा, अक्षदा फोटो स्टुडिओच्या वतीने एक फॅमिली पोर्टफोलिओ व आठ पासपोर्ट फोटोज. सदस्यत्व नोंदणीच्या अधिक माहितीसाठी ९८८११९६६७० या क्रमांकावर संपर्क साधावा.
लोकमत कॅम्पस सदस्यांकरिता रविवारी दुपारी तीन वाजता सरस्वती भुवन विद्यालय, जुना जालना येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सदस्यांसाठी मोफत असणार आहे. पहिली ते दुसरी, तिसरी ते पाचवी, सहावी ते सातवी आणि आठवी ते दहावी या चार गटात ही स्पर्धा होणार आहे. वरील प्रत्येक गटातून तीन विजेते घोषित करण्यात येणार आहेत. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. कॅम्पसची नोंदणी सरस्वती भुवन विद्यालयातही स.१० वाजेपासून सुरु आहे.
कॅम्पसच्या सदस्यांसाठी धमाल असा लकी ड्रॉही आयोजित करण्यात आलेला आहे. लकी ड्रॉतील विजेत्यांना स्मिताज्् सायकल वर्ल्ड तर्फे चार सायकल्स, संस्कृती युनिफॉर्म्स ३० स्कूल बॅग, मोबाईल वर्ल्ड तर्फे एक टॅबलेट, संदेश आॅप्टीकल्स तर्फे ५० गॉगल्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. येथे नाव नोंदणी
लोकमत कार्यालय, गीता कॉम्प्लेक्स भोकरदन नाका,जालना, सरिता ब्रिलियन्स अॅकडमी, बुलडाणा अर्बन बँकेजवळ, आर.पी. रोड, नवीन जालना, यश कॉम्प्युटर्स, आझाद मैदानाजवळ जालना, यम्मी हॉट पिझ्झा, अबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन जुना जालना, शिवाणी कलेक्शन, शनि मंदिर, जुना जालना, मोबाईल वर्ल्ड, सुंदर आर्केड, कडबी मंडी, नवीन जालना, ठाकरे क्लासेस, नगरपरिषद शाळेजवळ, रामनगर पोलिस कॉलनी जालना, स्मार्ट किडस्, अबॅकस अकॅडमी,सुखकर्ता निवास, सरकारी दवाखान्याजवळ, शिवनगर जुना जालना.