सातारा तांडा डास निर्मूलनासाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:05 IST2021-06-11T04:05:07+5:302021-06-11T04:05:07+5:30

सातारा तांडा, राज्य राखीव पोलीस बटालियन गट नंबर १४ तांडा, सातारा गाव, सादत नगर, मल्हार गल्ली, पटेल गल्ली, ...

Campaign for Satara Tanda mosquito eradication | सातारा तांडा डास निर्मूलनासाठी मोहीम

सातारा तांडा डास निर्मूलनासाठी मोहीम

सातारा तांडा, राज्य राखीव पोलीस बटालियन गट नंबर १४ तांडा, सातारा गाव, सादत नगर, मल्हार गल्ली, पटेल गल्ली, खंडोबा मंदिर परिसर, देवळाई गाव, झिरा काॅलनी, आयप्पा मंदिर समोर भागात कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात येऊन तेथे जनावरांच्या गोठ्यात डास संकलन करून तिथे कीटकनाशक औषध फवारणी, ऑबेट ट्रिटमेंट करण्यात आली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा, डाॅ. राणे, के. बी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मोहीम यशस्वी करण्यासाठी मलेरिया पर्यवेक्षक शेख अन्वर, कीटक समारक श्रीपाद सुभेदार, फवारणी कर्मचारी मनोज जगधने, विजय पगारे, भारत वाघ, रामनाथ रोकडे, दत्ता पिवळ, शेख अश्पाक, राहुल वाकेकर, अंभोरे, शेख, आदींनी परिश्रम घेतले.

कॅप्शन

सातारा तांडा परिसरात निवासी वसाहत व डास उत्पत्ती असलेल्या गोठ्यातदेखील औषध फवारणी करताना कर्मचारी.

Web Title: Campaign for Satara Tanda mosquito eradication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.