वीस हजार रेशuकार्ड वाटपाची मोहीम
By Admin | Updated: August 10, 2014 02:20 IST2014-08-10T02:11:55+5:302014-08-10T02:20:57+5:30
तामलवाडी : ग्रामीण भागातील कुटुंबांना गावस्तरावर धान्य मिळावे, यासाठी कार्यप्रणाी गतीमान झाली पाहिजे़ अन्नधान्यापासून कोणतेही कुटुंब वंचित

वीस हजार रेशuकार्ड वाटपाची मोहीम
तामलवाडी : ग्रामीण भागातील कुटुंबांना गावस्तरावर धान्य मिळावे, यासाठी कार्यप्रणाी गतीमान झाली पाहिजे़ अन्नधान्यापासून कोणतेही कुटुंब वंचित राहू नये, यासाठी २० हजार रेश्नकार्ड वाटप करण्याचे काम महसूलने हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नरनवरे यांनी दिली़
सुवर्ण जयंती राजस्व अभियान अंतर्गत आरळी (बु़ता़तुळजापूर) येथे समाधान योजनेचा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला़ यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ़सुभाष व्हट्टे, कृषी सभापती पंडीत जोकार, काशिनाथ बंडगर, पंसचे उपसभापती प्रकाश चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी जे़टी़पाटील यांची उपस्थिती होती़ कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी एस़पी़जाधव, पं़स़सदस्य मेघा तांबे, रविंद्र दळवी, चंद्रशेखर वडणे, गटविकास अधिकारी विकास खिल्लारे, तहसीलदार काशिनाथ पाटील, रसिक वाले, सविता भोसले, सरपंच चंद्रहार नारायणकर, उपसरपंच लक्ष्मण काटकर, सचिन पाटील, किसनराव भरगंडे, अनिल शिंदे, उमेश तांबे, तलाठी टिके, मटके, सुधाकर उकरंडे, शंकरराव पाटील, बाबा भोसले, साहेबराव घुगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते़ (प्रतिनिधी)