वाळूतस्करांविरुद्ध मोहीम
By Admin | Updated: July 13, 2014 00:20 IST2014-07-12T23:50:57+5:302014-07-13T00:20:07+5:30
जालना/ आष्टी : पावसाळा लांबल्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसह दुधना, गिरजा- पूर्णा या नद्यांच्या पात्रातून गेल्या काही दिवसांपासून तस्कारांनी अत्याधुनिक मशनरींद्वारे बेसुमार उपसा सुरुच ठेवला

वाळूतस्करांविरुद्ध मोहीम
जालना/ आष्टी : पावसाळा लांबल्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसह दुधना, गिरजा- पूर्णा या नद्यांच्या पात्रातून गेल्या काही दिवसांपासून तस्कारांनी अत्याधुनिक मशनरींद्वारे बेसुमार उपसा सुरुच ठेवला असून, उशिरा का होईना, महसूल प्रशासनास आता जाग येऊ लागली आहे.
अंबड तालुक्यातील ग्रामस्थांनी तस्करांविरोधात रस्त्यावर उतरुन आवाज उठविल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत १२ वाहने ताब्यात घेतली. पाठोपाठ आष्टीत शनिवारी केलेल्या कारवाईत बारा वाहनांसह शेकडो ब्रास वाळू जप्त करण्यात आली.
आष्टीत जोरदार मोहीम
कंत्राट संपल्यानंतर १५ लाख ७१३ ब्रासचे जास्तीचे उत्खनन झाल्याचे महसूल विभागाल तपासणीत आढळून आले.
परतूर तालुक्यातील गंगा सावंगी, गोळेगाव, चांगतपुरी आणि इतर गावातून गोदावरी नदी वाहते. मोठे पात्र असून मोठ्या प्रमाणात वाळू साठा या ठिकाणी आहे. शिवाय, ही वाट आडवळणी असल्याने कारवाईचा फारसा धोका नाही. रात्रीच्या वेळी तर वाळू चोरांची मोठी चांदी होते. या भागातील सर्वच रस्ते वाळू वाहतुकीमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत.
तहसीलदार विनोद गुडमवार यांनी ११ जुलै रोजी वाळू उपसा करण्याची मुदत संपत असल्याने सर्वच कंत्राटदारांना उपसा थांबविण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना सूचना देण्यात आली होती. आष्टीचे मंडळ अधिकारी घुगे यांनी नोटिसा बजावल्या. कंत्राटदारांनी त्या स्वीकारल्या, परंतु वाळू उपसा सुरूच होता.
या पार्श्वभूमीवर आष्टी पोलिस व पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दिवसभर कारवाई करून १२ वाहनांवर कारवाई केली. आष्टी पोलिसांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत.
आष्टी-परतूर मार्गावर वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची खबर पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांना देण्यात आली होती. महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार वाळू उपसा करण्याची मुदत ३० जूनला संपल्यानंतर ५ हजार ५३ ब्रास वाळूचे अवैध उत्खनन झाले आहे. गंगासावंगी परिसरातील पात्रातून ११ हजार ६६० ब्रास जास्तीच्या वाळूचे उत्खनन करण्यात आले आहे. ही वसुली संबंधित कंत्राटदाराकडून करण्याची मागणी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षांनी केली आहे. (वार्ताहर)
वाळूमाफियांचे धाबे दणाणले
गंगासावंगी, चांगतपुरी, गोळेगाव व इतर गावातील नदीच्या पात्रातून जास्तीच्या वाळूचे उत्खनन करण्यात आले आहे. हा संपूर्ण अहवाल महसूल विभागाने गोळा केला आहे. मात्र प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी कोणतीही उपाय योजना केली नाही. ्र्रपरतूर तालुक्यातील श्रीष्टी येथे पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १० टायरचे दोन ट्रक वाळू वाहतूक करतांना पकडले. ही घटना १२ जुलै रोजी दुपारी श्रीष्टी गावात घडली.
ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख डिगांबर हवाले, रामेश्वर जाधव, रामेश्वर बगाटे, राजू पवार, इरशाद पटेल, साई पवार, रेखा लाटे, पुनम भट, चालक अनिल जाधव यांनी शनिवारी दुपारी छापा मारून दोन्ही ट्रक पकडले.