वाळूचोरी रोखण्यासाठी ठेक्यांवर कॅमेऱ्यांची नजर
By Admin | Updated: December 9, 2014 01:00 IST2014-12-09T00:57:52+5:302014-12-09T01:00:52+5:30
औरंगाबाद : अवैध वाळूचोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाळूच्या ट्रकला जीपीएस यंत्रणा बसविण्याचा आणि वाळूच्या प्रत्येक ठेक्यांवर कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे

वाळूचोरी रोखण्यासाठी ठेक्यांवर कॅमेऱ्यांची नजर
औरंगाबाद : अवैध वाळूचोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वाळूच्या ट्रकला जीपीएस यंत्रणा बसविण्याचा आणि वाळूच्या प्रत्येक ठेक्यांवर कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वाळूचा उपसा सुरू करण्यापूर्वी ठेकेदारांनीच हे कॅमेरे बसवावेत, अशी अट लिलावात टाकण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ५० पैकी ४७ वाळू ठेक्यांचा लिलाव करण्यास पर्यावरण विभागानेही मंजुरी दिली आहे. त्यामुळे महिनाभरात लिलावाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वाळू ठेक्यांची मुदत ३० सप्टेंबरपूर्वीच संपली आहे. त्यानंतर आता चालू वर्षासाठी नवीन वाळू ठेक्यांचा लिलाव करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने चालविली आहे. त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाकडून पात्र वाळूपट्ट्यांची यादी मागविण्यात आली होती. यावेळी भूजल सर्वेक्षण विभागाने ५० वाळूपट्टे लिलावासाठी योग्य असल्याची शिफारस केली. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालय आणि पर्यावरण समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.