कचरा टाकणाऱ्यांवर कॅमेऱ्याचा वॉच
By Admin | Updated: July 7, 2014 00:15 IST2014-07-06T23:31:40+5:302014-07-07T00:15:18+5:30
जालना: कचरा टाकू नका... येथे घाण होते.. अशी अनेकदा विनंती करुनही न ऐकणाऱ्यांसाठी एका नागरिकाने चक्क सीसीटीव्ही कॅमेरा बसवून कचरा टाकणाऱ्यावर वॉच ठेवला आहे.

कचरा टाकणाऱ्यांवर कॅमेऱ्याचा वॉच
जालना: कचरा टाकू नका... येथे घाण होते.. अशी अनेकदा विनंती करुनही न ऐकणाऱ्यांसाठी एका नागरिकाने चक्क सीसीटीव्ही कॅमेरा बसवून कचरा टाकणाऱ्यावर वॉच ठेवला आहे.
जुना जालना भागातील कचेरी रोडवर अमित कासारी नावाचे गृहस्थ राहतात. त्यांच्या घराजवळील जागेत परिसरातील अनेक नागरिक सातत्याने कचरा आणून टाकत असल्याने तेथे उकिरडा तयार झाला. याचा त्रास कासारी यांच्यासह अनेकांना होत आहे. कासारी यांनी नागरिकांना येथे कचरा टाकू नका, दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अस्वच्छता वाढत आहे, असे वारंवार सांगितले. परंतु काही नागरिकांचा कचरा टाकण्याचा दिनक्रम बंद होईना.
अखेर कासारी यांनी तब्बल साडेसहा हजार रुपये खर्च करुन सीसीटीव्ही कॅमेरा बसवून कचरा टकाणाऱ्यांवर वॉच ठेवला आहे.
याविषयी अमित कासारी म्हणाले, घराजवळ कचरा टाकू नये यासाठी आम्ही तीन ते चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहोत. कचऱ्यामुळे दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.
घरात बसणे अवघड होऊन बसले आहे. नागरिक ऐकत नाहीत. नगरपालिका तसेच नगरसेवकांनाही अनेकदा सांगितले. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही.
अखेर कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतला. कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधात नगर पालिका तसेच पोलिसांत तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)