शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बँकेची परीक्षा देऊन आला, वडिलांना फोन केला; मध्यरात्री हॉस्टेलच्या छतावर जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 19:29 IST

शेवटी वडिलांसाेबत काॅलवर संवाद साधल्यानंतर उचलले पाऊल

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगरहून बँकिंगचा पेपर देऊन वसतिगृहात परतलेल्या २२ वर्षीय सौरभ सुरेश काळबांडे या तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवले. पदवीनंतर त्याने परीक्षेची तयारी सुरू केली होती. परंतु, स्पर्धेच्या तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजता हॉस्टेलमधील तरुण छतावर गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मूळ वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडीचा असलेल्या सौरभचे वडील शेती करतात, तर आई गृहिणी असून एक लहान भाऊ व मोठी बहीण आहे. बारावीपर्यंत गावाकडे शिकलेल्या सौरभने पदवीच्या शिक्षणासाठी गाव सोडले होते. गतवर्षी बी.एसस्सी. कृषी उत्तीर्ण झाल्यानंतर बँकेत अधिकारी होण्याचे ध्येय सौरभने ठरवले होते. त्यासाठी तो शहरात आला होता. क्लासेस करून अजबनगरमधील हॉस्टेलमध्ये राहत होता. २ जुलै रोजी आयडीबीआय बँकेच्या अधिकारीपदाची परीक्षा होती. त्यात त्याचे अहमदनगरला परीक्षा केंद्र होते.

वडिलांशी बराच वेळ कॉलवर बोलला, मित्र नेमका बाहेर गेलासौरभच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मित्रांकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ वडिलांना नेहमी कॉल करून अभ्यास, दिनक्रमाविषयी सांगायचा. रविवारी परीक्षा देऊन आल्यानंतर तो मित्रांसोबत खाणावळीत गेला. त्यानंतर तो बराच वेळ वडिलांशी बोलला. त्याच्या खोलीतील पार्टनर नंतर दुसऱ्या मित्राकडे झोपायला गेला. त्यानंतरच सौरभने मध्यरात्री हॉस्टेलच्या छतावर गळफास घेतला. सोमवारी घटनेची माहिती कळताच निरीक्षक संतोष पाटील यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक अशाेक शिर्के यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घटना कळताच नातेवाईक दुपारी घाटीत दाखल झाले. चुलत भाऊ, काकांनी सौरभचा मृतदेह दिसताच टाहो फोडला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण