शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

केम्ब्रिज, सेंट लॉरेन्स, एस.बी.ए. संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:36 AM

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी केम्ब्रिजने पर्ल्स अकॅडमीचा, सेंट लॉरेन्सने न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूलचा, टेंडर केअर होम संघाने सेंट झेव्हिअर्स संघाचा आणि पीएसबीएने रिव्हरडेल संघाचा पराभव केला. आज झालेल्या समन्यात सिमर राजपाल, विशाल धुमाळ, शिवम काळे आणि किरण खंबायत यांनी सामनावीर किताबाचा मान मिळवला.

ठळक मुद्देआंतरशालेय क्रिकेट स्पर्धा : सिमर राजपालचे ३ धावांत ४ बळी

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी केम्ब्रिजने पर्ल्स अकॅडमीचा, सेंट लॉरेन्सने न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूलचा, टेंडर केअर होम संघाने सेंट झेव्हिअर्स संघाचा आणि पीएसबीएने रिव्हरडेल संघाचा पराभव केला. आज झालेल्या समन्यात सिमर राजपाल, विशाल धुमाळ, शिवम काळे आणि किरण खंबायत यांनी सामनावीर किताबाचा मान मिळवला.सकाळच्या सत्रातील पहिल्या लढतीत सेंट लॉरेन्सने प्रथम फलंदाजी करताना १0 षटकांत ४ बाद ९३ धावा केल्या. त्यांच्याकडून आयुषसिंगने १५ चेंडूंत ४ चौकारांसह २५, विशाल धुमाळने ९ चेंडूंत ४ चौकारांसह १९ आणि पी. वाघ याने १७ धावांचे योगदान दिले. न्यू बिगिनिंग इंटरनॅशनलकडून सागर मुके याने १0 धावांत २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात न्यू बिगिनिंग इंटरनॅशनल स्कूलचा संघ ८.२ षटकांत ४९ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून जीवन येवले याने १४ धावा केल्या. सेंट लॉरेन्सकडून विशाल धुमाळने ९ धावांत ४ गडी बाद केले.दुसऱ्या सामन्यात सिमर राजपाल आणि रौनक डोडिया यांच्या भेदक माºयासमोर केम्ब्रिजने पर्ल्स अकॅडमीला ५.४ षटकांत अवघ्या १४ धावांत गुंडाळले. केम्ब्रिजकडून सिमर राजपाल याने ३ धावांत ४ गडी बाद केले. त्याला रौनक डोडिया याने ५ धावांत ३ गडी बाद करीत साथ दिली. केम्ब्रिजने विजयी लक्ष्य ५ चेंडूंत पूर्ण केले. त्यांच्याकडून संकेत पाटीलने नाबाद १0 धावा केल्या.तिसºया सामन्यात टेंडर केअर होम संघाविरुद्ध सेंट झेव्हिअर्सने प्रथम फलंदाजी करीत १0 षटकांत ६ बाद ६५ धावा केल्या. त्यांच्याकडून एस. राठोडने १९ व चंद्रशेखर शिंदेने १0 धावा केल्या. टेंडर केअर होमकडून शिवम काळेने ११ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात टेंडर केअर होम संघाने ८.४ षटकांत ८ फलंदाज गमावून विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून शुभम रामपुरेने सर्वाधिक १४ धावा केल्या. सेंट झेव्हिअर्सकडून ऋषिकेश डी., विनय अहिरे व आर. पाटील यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. विशेष म्हणजे सेंट झेव्हिअर्सने २४ धावा अवांतर देत त्यांच्या संघावर पराभवाची नामुष्की ओढवून घेतली.दुसºया सामन्यात गुडईअरविरुद्ध आयजीटीआरने २० षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. त्यांच्याकडून ऋषिकेश तरडे याने ५९ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५९ धावा केल्या. गौरव शिंदेने ४३ चेंडूंत ६ चौकारांसह ४६ धावांचे योगदान दिले. गुडईअरकडून कमलेश कालवावे याने २७ धावांत २ गडी बाद केले. प्रदीप यादव व अजित महालिंगा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात गुडईअरने विजयी लक्ष्य १७.२ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून जालिंदर हिवराळेने ३१ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३८ धावा केल्या. प्रदीप यादवने २१ व असिफ खानने १९ धावांचे योगदान दिले. आयजीटीआरकडून महेश वझे व ऋषिकेश तरडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे १६ व २२ धावा मोजल्या.तिसºया सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकांत सर्वबाद ११६ धावा केल्या. त्यांच्याकडून सौरभ लड्डा याने ५२ चेंडूंत ८ चौकार, २ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. विनोद शाहूराजेने ३ चौकारांसह १८ धावांचे योगदान दिले. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नीरज देशपांडेने ९ धावांत ४ गडी बाद केले. मनोज घोडेके व रवींद्र तोंडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे १८ व १९ धावा मोजल्या. प्रत्युत्तरात सार्वजनिक बांधकाम विभागाने विजयी लक्ष्य १५.३ षटकांत पूर्ण केले. त्यांच्याकडून योगीराज चव्हाण याने चौफेर टोलेबाजी करीत २२ चेंडूंतच ३ चौकार व ३ टोलेजंग षटकारांसह ४० धावांची स्फोटक खेळी केली. अजिंक्य दाभाडे, रवींद्र तोंडे, मनोज घोडके आणि योगेश राठी यांनी प्रत्येकी १३ धावांचे योगदान दिले. वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाकडून आनंद वाडशेलारने २६ धावांत ३ गडी बाद केले. विनोद शाहूराजे, महेश जाधव आणि सौरभ लड्डा यंनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आज झालेल्या सामन्यात पंच म्हणून विष्णू बब्बीरवार, गंगाधर शेवाळे, महेश सावंत, उदय बक्षी यांनी काम पाहिले. गुणलेखन राजेश भिंगारे व अजित कुमार यांनी केले.