डीपीऐवजी आॅईलवरच बोळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:45 IST2017-11-22T23:44:38+5:302017-11-22T23:45:22+5:30
मागील अनेक दिवसांपासून रोहित्रांचा प्रश्न गाजत आहे. आज तर महावितरणने कमालच केली. रोहित्र देण्याची तारीख दिलेल्या शेतकºयांनी स्वत: भाड्याचे वाहन आणल्याचे पाहून रोहित्राऐवजी चक्क आॅईलची टाकी देवून बोळवण केल्याचा प्रकार घडला.

डीपीऐवजी आॅईलवरच बोळवण
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील अनेक दिवसांपासून रोहित्रांचा प्रश्न गाजत आहे. आज तर महावितरणने कमालच केली. रोहित्र देण्याची तारीख दिलेल्या शेतकºयांनी स्वत: भाड्याचे वाहन आणल्याचे पाहून रोहित्राऐवजी चक्क आॅईलची टाकी देवून बोळवण केल्याचा प्रकार घडला.
हिंगोली जिल्ह्यात अनेक गावातील रोहित्रांचा प्रश्न अजून कायम आहे. तो सोडविण्यासाठी विविध पक्ष, संघटनाही झगडत आहेत. तरीही दिलेल्या तारखेला रोहित्र मिळतच नाही. प्रत्येक भेटीत दुसरी तारीख ऐकावी लागत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. बुधवारी तर २० ते २५ गावातील शेतकºयांना वेळापत्रकानुसार रोहित्र मिळणे अपेक्षित होते. मात्र ते न मिळाल्याने शेतकºयांनी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांना घेराव घालत रोहित्र घेऊन जाण्यास वाहनासह आलेले शेतकरी तारखेच्या पावत्या दाखवत होते. जाधव शेतकºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तर इतर शेतकºयांनाही कॅबीनमध्ये येवू देत नव्हते. त्यामुळे अभियंते काही वेळासाठी बुचकळ्यात पडले होते. शेतकरी तर महावितरण कार्यालयातील सुरक्षा रक्षकांनाही जुमानत नव्हते.