खासगी रुग्णालयातील सीझरचे प्रमाण ८० टक्यावर, शासकीय रुग्णालयात ते प्रमाण केवळ २० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:06 IST2020-12-24T04:06:21+5:302020-12-24T04:06:21+5:30

सुरेश चव्हाण कन्नड : आरोग्य सेवाला सुद्धा गेल्या काही दिवसात व्यवसायिक स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील सीझरने ...

Caesarean section in private hospitals is at 80 per cent, while in government hospitals it is only 20 per cent | खासगी रुग्णालयातील सीझरचे प्रमाण ८० टक्यावर, शासकीय रुग्णालयात ते प्रमाण केवळ २० टक्क्यांवर

खासगी रुग्णालयातील सीझरचे प्रमाण ८० टक्यावर, शासकीय रुग्णालयात ते प्रमाण केवळ २० टक्क्यांवर

सुरेश चव्हाण

कन्नड : आरोग्य सेवाला सुद्धा गेल्या काही दिवसात व्यवसायिक स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील सीझरने प्रसुती होण्याचे प्रमाण जवळपास ८० टक्यांपर्यंत तर तेच प्रमाण शासकीय रुग्णालयात केवळ २० टक्क्यांपर्यंत असल्याचे स्थिती पुढे आली आहे. गेल्या अकरा महिन्यात कन्नड तालुक्यात खासगी आणि शासकीय रुग्णालयात एकूण साडेअकराशे प्रसुती झाल्या असल्याची नोंद आहे.

कन्नड ग्रामीण रुग्णालयात जानेवारी ते नोव्हेंबरअखेर एकूण १ हजार १८२ तर खाजगी दवाखान्यात ५४४ प्रसुती झाल्या. ग्रामीण रुग्णालयात बऱ्याचदा प्रसुतीसाठी भरती होण्याची प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. कारण याठिकाणी चांगले उपचार तसेच खर्च कमी येत असल्याने महिलांसह त्यांचे कुटुंब ग्रामीण रुग्णालयास अधिक प्राधान्य देतात. दुसरी जमेची बाजू म्हणजे येथे केवळ २० टक्के महिलांचे सीझर होत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. तेच प्रमाण खासगी रुग्णालयात ८० टक्यापर्यंत जाते. गेल्या अकरा महिन्यात खाजगी दवाखान्यातील ५४४ प्रसुतींपैकी २९५ मुले तर २४९ मुलींचा जन्म झाला.

----- कोट -------

शासकीय रुग्णालयात सहसा सीझर होत नाही. नैसर्गिक प्रसुतीसाठी अधिक प्रयत्न होतात. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासकीय रूग्णालयात सरझर करणे बंद आहे.

डॉ. दत्ता देगावकर, वैद्यकीय अधिक्षक

---------------

महिना खाजगी दवाखाना सरकारी दवाखाना

- जानेवारी २७ ९४

- फेब्रुवारी ३४ ९८

- मार्च ४५ १३१

= एप्रिल ६१ ११७

- मे ६१ १०५

- जुन ६१ ९६

- जुलै ४६ ८१

- ऑगस्ट ७४ १०८

- सप्टेबर ५१ १११

- ऑक्टोबर ५० १३२

-नोव्हेंबर ३४ १०९

Web Title: Caesarean section in private hospitals is at 80 per cent, while in government hospitals it is only 20 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.