कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला
By Admin | Updated: September 16, 2014 01:30 IST2014-09-16T00:32:47+5:302014-09-16T01:30:47+5:30
परतूर : परतूर तालुक्यात कापूस पिकावर रस शोषण करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही बाब कीड व रोग सनियंत्रण प्रकल्पाच्या पाहणी अहवालात आढळून आली आहे.

कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला
परतूर : परतूर तालुक्यात कापूस पिकावर रस शोषण करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ही बाब कीड व रोग सनियंत्रण प्रकल्पाच्या पाहणी अहवालात आढळून आली आहे. वेळीच नियंत्रण करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे . कपाशी या पिकावर रस शोषण करणाऱ्या अळी व किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर योग्य त्या कीटकनाशकांची फवारणी करावी, तसेच पतंगासाठी फेरोमन सापळयांची उभारणी करावी. किडीच्या आर्थिक नुकसान पातळीवरील आधारित फवारणी करावी, नत्रयूक्त खतांचा वापर टाळावा, शेतातील अतिरिक्त पाण्याचा उत्तम निचरा करावा व पीक तणमुक्त ठेवावे, तरी कपाशीवरील रोग नियंत्रणाठी योग्य औषधीची फवारणी करून अधिक माहीतीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही अवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले आहे. (वार्ताहर)