केबल वायरने कापला तरुणाचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:18 IST2017-09-24T00:18:16+5:302017-09-24T00:18:16+5:30
दुचाकीवरून घरी निघालेल्या महाविद्यालयीन तरुणांसमोर अचानक केबल वायर आले. या केबलने तरुणाचा गळाच चिरल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ४.२० वाजता महावीर उड्डाणपुलावर घडली.

केबल वायरने कापला तरुणाचा गळा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद: दुचाकीवरून घरी निघालेल्या महाविद्यालयीन तरुणांसमोर अचानक केबल वायर आले. या केबलने तरुणाचा गळाच चिरल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ४.२० वाजता महावीर उड्डाणपुलावर घडली. गंभीर जखमी तरुणाला त्वरित खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला.
मोबाइल कंपन्यांसारखी स्पर्धा शहरातील केबल आॅपरेटर्समध्ये आहे. कंपनीविरुद्ध स्थानिक केबल आॅपरेटर असा खेळ मागील काही वर्षांपासून रंगला आहे. एका मोठ्या केबल कंपनीने बहुतांश भाग खेचून घेतला आहे. स्थानिक केबल आॅपरेटर ग्राहक वाचविण्यासाठी धडपडत आहेत. मागील काही वर्षांमध्ये केबल कंपन्यांनी महापालिकेची कोणतीच परवानगी न घेता हजारो किलोमीटर्सच्या वायरचे जाळे विणले. प्रत्येक पथदिव्यावरून ही केबल ओढली आहे. या केबलमुळे वाहनधारक, नागरिकांना त्रास होईल, याचा विचार करण्यात आलेला नाही. शहर विद्रुपीकरणात केबलचे जाळे दिवसेंदिवस भर घालत आहे. महापालिका मात्र मूग गिळून आहे. एका खाजगी कंपनीला ४ जी केबल टाकायची होती. या कंपनीने अधिकृतपणे मनपाकडे दोन कोटी रुपये भरून शहरात केबल टाकली. हाच नियम केबल कंपन्यांनाही लागू होतो. सर्व नियम धाब्यावर बसवून केबल कंपन्या काम करीत असल्याने आज औरंगाबादकर असुरक्षित झाले आहेत.