मंत्रिमंडळ जिल्ह्याच्या मुळावर-गोरंट्याल
By Admin | Updated: September 9, 2015 00:09 IST2015-09-09T00:08:43+5:302015-09-09T00:09:06+5:30
जालना : दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्याबाबत राज्याचे मंत्रिमंडळ उदासीन असल्याचा आरोप माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.

मंत्रिमंडळ जिल्ह्याच्या मुळावर-गोरंट्याल
जालना : दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्याबाबत राज्याचे मंत्रिमंडळ उदासीन असल्याचा आरोप माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा दौरा केला. त्यात त्यांनी जालन्याकडे पाठ फिरविली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही परभणी, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील चारा छावण्या सुरू करण्याची घोषणा केली. मात्र, जालन्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सतच्या दुष्काळामुळे सर्वात कमी पावसाची नोंद झाली असल्याने धरणे, तलावांनी तळ गाठला. चारा संपल्याने पशुधन संकटात सापडले आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या जालना जिल्ह्यात झाल्या आहेत. जिल्हा प्रशासन दुष्काळ निवारणासाठी गांभिर्याने उपाययोजना करत नसल्याने मंत्रालयापर्यंत दुष्काळाची दाहकता पोहोचत नसल्याचा आरोपही गोरंट्याल यांनी केला आहे.