शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर मनपाची आर्थिक कोंडी; हुडकोकडून ८२२ कोटींच्या कर्जास मंत्रिमंडळ मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:09 IST

नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपाचा स्वहिस्सा, हुडकोकडून ८.९० टक्के दराने कर्जाला मंजुरी; दरमहा १७ ते १८ कोटींचा हप्ता द्यावा लागणार

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी २७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत महापालिकेला स्वहिस्सा म्हणून ८२२ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. एवढी मोठी रक्कम मनपाकडे नाही. मागील काही वर्षांपासून ही रक्कम बिनव्याजी कर्ज स्वरूपात मिळावी यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू होते. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मनपाला ८२२ कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले. हुडकोकडून हे कर्ज मनपाला ८.९० टक्के दराने मिळेल. या कर्जाचा हफ्ता दरमहा किमान १७ ते १८ कोटी रुपये राहणार आहे.

२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत केंद्र शासन २५ टक्के, राज्य शासन ४५ टक्के आणि मनपा ३० टक्के रक्कम देईल असे ठरले. त्यानुसार कोरोना संसर्गापूर्वी काम सुरू झाले. महापालिकेने आपल्या हिश्शाची रक्कम टाकलीच नाही. कारण एवढी मोठी रक्कम मनपाकडे नाही. मागील २ वर्षांपासून बिनव्याजी कर्ज मिळावे यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी राज्य शासनाने मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मनपाला हुडकोकडून ८.९० टक्के दराने ८२२ कोटी २२ लाख रुपये मंजूर केले. या कर्जाचा दरमहा हप्ता किमान १७ ते १८ कोटी रुपये येईल. एवढी मोठी रक्कमही मनपाला अदा करणे शक्य होणार नाही.

-योजनेचा एकूण खर्च-२७४० कोटी रुपये-केंद्र सरकार हिस्साः २५ टक्के (६८५ कोटी १९ लाख)- राज्य शासन हिस्साः ४५ टक्के (१२३३ कोटी ३४ लाख)

- महापालिकेचा हिस्साः ३० टक्के (८२२ कोटी २२ लाख)

आतापर्यंत कोणाचा किती निधी प्राप्तशासन....... एकूण हिस्सा..... दिलेला निधी..... प्रलंबित निधी (आकडे कोटीत)केंद्र.............६८५ ------------६४६------------- ३९राज्य....... १२३३---------------- ११६१------------७२मनपा........८२२------------------०००-------------८२२

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरState Governmentराज्य सरकारAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका