चार पोलिसांवर बडतर्फीची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:27 IST2017-07-30T01:27:30+5:302017-07-30T01:27:30+5:30
भोकरदन : वालसावंगी येथील अर्धघाऊक रॉकेल विक्रेत्याला खंडणी मागितल्याप्रकरणी भोकरदन न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेल्या चार पोलीस कर्मचाºयांवर बुलडाणा पोलीस अधीक्षकांकडून बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

चार पोलिसांवर बडतर्फीची टांगती तलवार
ल्ोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : वालसावंगी येथील अर्धघाऊक रॉकेल विक्रेत्याला खंडणी मागितल्याप्रकरणी भोकरदन न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेल्या चार पोलीस कर्मचाºयांवर बुलडाणा पोलीस अधीक्षकांकडून बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे.
वालसावंगी येथील रॉकेलचे अर्धघाऊक विक्रेता भगवान शिनकर यांना २० डिसेबर २००५ रोजी खंडणी मागीतल्या प्रकरणी बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कर्मचारी सुभाष चांगदेव वानखेडे, गजानन ज्ञानेश्वर इंगळे, सुनील लक्ष्मण जाधव, अंकुश मदनसिंग राजपूत यांना भोकरदन न्यायालयाने दोन वर्षाची सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाºयांना शिक्षा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक शशिकुमार मिना यांनी सदर पोलीस कर्मचाºयांची माहिती मागवली आहे. न्यायालयीन निकालाची अधिकृत प्रत मिळाल्यानंतर सदर कर्मचाºयांवर बडतर्फीची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. सध्या या चार पोलिसांपैकी तीन पोलिस कर्मचारी बुलडाणा पोलीस मुख्यालयात तर एक कर्मचारी देऊळगावराजा येथे कार्यरत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे यांनी सांगितले की, बुलडाणा येथील चार पोलीस कर्मचाºयांना भोकरदन न्यायालयाने दोन वर्ष कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावल्याचे आपणास समजले. न्यायालयाच्या निकालाची प्रत बुलडाणा पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात येईल.