सी. ए. क्रिकेट स्पर्धा २७ जानेवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:34 IST2018-01-23T00:34:24+5:302018-01-23T00:34:42+5:30
नेहमीच कामात व्यस्त असणाºया चार्टर्ड अकाऊंटंटस् यांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने एमजीएम स्टेडियमवर औरंगाबाद सी. ए. असोसिएशनतर्फे २७ ते ३१ जानेवारीदरम्यान टी-१० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजन स्पर्धा समितीचे अध्यक्ष रोहन आंचलिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सी. ए. क्रिकेट स्पर्धा २७ जानेवारीपासून
औरंगाबाद : नेहमीच कामात व्यस्त असणाºया चार्टर्ड अकाऊंटंटस् यांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने एमजीएम स्टेडियमवर औरंगाबाद सी. ए. असोसिएशनतर्फे २७ ते ३१ जानेवारीदरम्यान टी-१० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजन स्पर्धा समितीचे अध्यक्ष रोहन आंचलिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेत दहा संघांचा सहभाग असणार असून, प्रत्येक संघास चार साखळी सामने खेळता येणार आहेत. हे सामने सकाळी ७.३0 ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान आयोजित केले जाणार आहेत.
प्रत्येक संघात ६ सीए व उर्वरित विद्यार्थी असणे बंधनकारक आहे. या स्पर्धेनिमित्त २५ जानेवारी रोजी सीए असोसिएशन हेल्मेटविषयी जनतेत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मोटारसायकल रॅली काढणार आहे. रॅलीस क्रांतीचौक येथून सकाळी ८.३0 वाजता प्रारंभ होणार असून, त्याचा समारोप एमजीएम मैदानावर होणार आहे, असे आंचलिया यांनी सांगितले.