बायपासचा ‘वन-वे’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:54 IST2017-10-04T00:54:34+5:302017-10-04T00:54:34+5:30
सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्ता एका बाजूने मंगळवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे शहरातून जाणारी अवजड वाहने वळण रस्त्यावरून धावतील

बायपासचा ‘वन-वे’ सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्ता एका बाजूने मंगळवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे शहरातून जाणारी अवजड वाहने वळण रस्त्यावरून धावतील. यामुळे शहरवासीयांना होणार त्रास कमी होणार आहे. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. आ.विनायक मेटे यांनी झेंडा दाखवून वाहने मार्गस्थ केली.
बिंदुसरा नदीवरील जुना पुल धोकादायक झाल्याने बंद केला आहे तर पर्यायी पुल पावसामुळे वाहुन गेला होता. त्यानंतर काही दिवस शहरातून वाहतूक वळविली होती. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यानंतर या पुलावरून ‘राजकारण’ झाले. काही दिवसांत हा पर्यायी पूल तातडीने तयार करण्यात आला. परंतु महामार्गावरील वळण रस्ता सुरू करण्यासाठी प्रशासकीय तसेच राजकीय पातळीवरून प्रयत्न सुरू होते. आ.जयदत्त क्षीरसागर, आ.विनायक मेटे यांनी आयआरबी व प्रशासकीय अधिकाºयांना सोबत घेत पाहणी केली होती. त्यानंतर हा रस्ता लवकरच खुला केला जाईल, असे अश्वासने मिळाली होती. अखेर मंगळवारी हा वळण रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे शहरातून जाणारी वाहतूक वळण रस्त्यावरून वळविली आहे.
दरम्यान, आ. मेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या सोबत बैठक घेऊन बायपास व पर्यायी पुलाचा प्रश्न लावून धरला होता. अखेर अनेक दिवसापासून रेंगाळलेला बायपासचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे बीड शहराची वाहतुक समस्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरवासीय मोकळा श्वास घेणार आहेत. दिवाळीच्या ऐन सणामध्ये हा प्रश्न मार्गी लागल्याने व्यापारी, नागरिकांत समाधान आहे. रस्ता खुला करतावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर अप्पा कोलंगडे, डॉ. रमेश पानसंबळ, पत्रकार गंमत भंडारी, विजयराज बंब, जि.प. सदस्य भारत काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील, अनिल घुमरे, जयसिंग चुंगडे, गणेश वरेकर, जगदीश गुरखुदे, रामहारी मेटे, राजेंद्र बहिर, मनोज जाधव, नंदकुमार पिंगळे, सचिन कोटुळे, डॉ. राजेंद्र बंड, मुज्जफर चौधरी, शेख अखिल, जुनेद खान, हनुमंत पवार, कैलास शेजाळ, साथिराम ढोले, चंदू साबळे, अक्षय माने आदी उपस्थित होते.