पोटनिवडणुकीत ३७़१ % मतदान
By Admin | Updated: June 30, 2014 00:39 IST2014-06-30T00:19:58+5:302014-06-30T00:39:47+5:30
नांदेड: कैलासनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी ३७़ १ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ एकूण ११ हजार ७७४ पैकी ४ हजार ३५७ मतदारांनी मतदान केले़
पोटनिवडणुकीत ३७़१ % मतदान
नांदेड: कैलासनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी ३७़ १ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ एकूण ११ हजार ७७४ पैकी ४ हजार ३५७ मतदारांनी मतदान केले़
२९ जून रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत प्रभागातील १६ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली़ नांदेड महापालिकेतील प्रभाग क्रं़ ९ मधील (कैलासनगर, श्रीनगर ) काँग्रेसचे नगरसेवक सुधाकर पांढरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता़ त्यानंतर या रिक्त पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली़ या निवडणुकीतील अब्दुल रज्जाक अब्दुल वहाब,(अपक्ष), आगाशे अनुप श्रीराम, (अपक्ष) , खेडकर प्रमोद मुरलीधर, (शिवसेना) , शेख अफसर शेख बाबू, (राष्ट्रवादी काँग्रेस), मंगला महादेवराव निमकर, (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), शेख अस्लम ऊर्फ मुन्नाभाई खोकेवाला, (अपक्ष), वाजीद जहागीरदार,(इंडियन युनियन मुस्लिम लीग) या सात उमेदवारांचे भविष्य मतदारांनी मतदान यंत्रात बंद केले़
३७़०१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ एकूण ११ हजार ७७४ पैकी ४ हजार ३५७ मतदारांनी मतदान केले़ यामध्ये ५ हजार ९९५ पैकी २ हजार ३८८ पुरूष तर ५ हजार ७७९ महिला मतदारांचा समावेश आहे़ यापैकी १ हजार ९६९ महिला व २ हजार ३८८ पुरूष मतदारांनी मतदान केले़ मतदन केंद्र क्रमांक ६ वर सर्वाधिक मतदान ५७़७९ टक्के तर सर्वात कमी २०़२२ टक्के मतदान केंद्र क्रमांक ११ वर झाले़ सकाळी सातेसात ते साडेनऊ या वेळेत ४़ ७३ टक्के, साडेनऊ ते साडेआकरा या वेळेत केवळ १२़९२ टक्के, साडेअकरा ते दीड या वेळेत २२़४६ टक्के तर दीड ते साडेतीन या वेळेत २९़६५ मतदान झाले़
निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र खंदारे, गुलाम सादेक, शिवाजी डहाळे, गणेशराव आडेराघो, शिवाजी बाबरे, सुनील देशमुख, दिलीप टाकळीकर, रमेश चवरे, वानखेडे, इनामदार, महमद युनूस यांनी निवडणूक प्रक्रियेत काम केले़ १६ मतदान केंद्रासाठी १८ मतदान केंद्राध्यक्ष, १०० मतदान कर्मचारी, १०० पोलिस कर्मचारी कार्यरत होते़ सहायक पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक आऱ ए़तासीलदार, भाग्यनगरचे पालीवाल यांनी बंदोबस्त ठेवला़ (प्रतिनिधी)
सोमवारी मतमोजणी
सोमवारी सकाळी ९ वाजेपासून स्टेडियम परिसरातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतमोजणीला सुरूवात होणार आहे़ या प्रकियेसाठी चार टेबलची व्यवस्था करण्यात आली असून चार फेऱ्या होतील़ प्रत्येक टेबलवर चार मतदान यंत्रामधील मतांची मोजणी केली जाईल़ सकाळी ११ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे़